June 29, 2025 11:37 pm

धुळ्यात लव्ह जिहाद..? हर्षल निघाला अर्शद मलिक नेमकं प्रकरण काय?

अपनी भाषा में पढ़े! Translate

श्रद्धा वालकरची तिच्या लिव्ह-इन पार्टनरने दिल्लीतल्या फ्लॅटवर हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. अशाच पद्धतीने मारण्याची आणि 70 तुकडे करण्याची धमकी धुळे येथील महिलेला तिच्या लिव्ह-इन पार्टनरने दिलीये. धक्कादायक बाब म्हणजे हर्षल माळी म्हणून स्वतःची ओळख सांगणारा तरुण अर्शद सलीम मलिक असल्याचं कळल्यानंतर महिलेला धक्काच बसला.

पीडिता आणि आरोपी जुलै 2022 पासून एकत्र राहतात. त्याआधी 4 एप्रिल 2016 रोजी पीडित महिलेचं पहिलं लग्न झालं होतं. तिला पहिल्या पतीपासून 2017 मध्ये मुलगा झाला. 2019 मध्ये तिच्या पतीचे अपघाती निधन झाले.पीडित महिलेची एका अकॅडमीत हर्षल माळी नावाच्या तरुणाशी ओळख झाली. त्याने तिला लळिंग येथे नेऊन अत्याचार केले. अत्याचार करतानाचा व्हिडीओ बनवला आणि तिला धमकावलं. नंतर त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

ते दोघं जुलै 2021 मध्ये लिव्ह इन रिलेशनशिपबाबत अमळनेर येथे प्रतिज्ञापत्र तयार करायला गेले. त्यावेळी पीडितेला कळलं की, हर्षल माळीचं खरं नाव अर्शद सलीम मलिक आहे. अर्शदने तिला उस्मानाबाद येथे एका फ्लॅटवर नेले.पीडितेने फिर्यादीत म्हटलं आहे की, ‘अर्शदने आपल्याला सक्तीने धर्मांतर करायला लावले. पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाचेही धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला आणि या आरोपीच्या पित्यानेही आपल्यावर अनैसर्गिक अत्याचार केले’, असे पीडितेने फिर्यादीत म्हटलंय.चार महिन्यांनी अर्शदने पीडितेला धुळे शहरातील विटा भट्टी भागातील घरी आणले. 26 ऑगस्ट 2022 रोजी तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्यानंतरही सलीम बशीर मलिककडून म्हणजे लिव्ह-इन मध्ये राहत असलेल्या तरुणाच्या बापाकडून अनैसर्गिक अत्याचार सुरूच होते.पीडितेनं म्हटलंय की, ‘अर्शदने पीडितेचे धर्मांतर करवून घेतले. तिच्या पाच वर्षांच्या पहिल्या मुलाची खतना करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्याला विरोध केल्यामुळे अर्शदने दिल्लीतील श्रद्धा वालकरच्या बातम्यांची आठवण करून दिली. तिचे तर फक्त 35 तुकडे केले गेले, तुझे आम्ही 70 तुकडे करू, अशी धमकी त्याने दिली’, असं पीडितेने तक्रारीत म्हटलंय.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!