भालेरावनगर व पाटीलगढीत गुणवंत गौरव व सेवापूर्ती सोहळा संपन्

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260914-WA0099

भालेरावनगर व पाटीलगढीत गुणवंत गौरव व सेवापूर्ती सोहळा संपन्

 

अमळनेर : विक्की जाधव.

भालेरावनगर व पाटीलगढी परिसरातील सामाजिक एकजुटीचा आणि संस्कारांचा प्रत्यय देणारा गुणवंत गौरव व सेवापूर्ती सोहळा ११ सप्टेंबर रोजी मुंदडा एक्झोटिका येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रप्रमुख गोकुळ पाटील होते. दाते महेश देशमुख, नगरसेविका निलिमा पाटील व समाजसेवक रविंद्र पितांबर पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन, तर सेवानिवृत्त शिक्षक व विविध क्षेत्रातील पुरस्कारप्राप्त बंधू-भगिनींचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. रामकृष्ण पाटील यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमास सुरुवात झाली. उज्वल पाटील यांनी गणेशवंदना सादर केली, तर हरिचंद्र शिवराम कढरे यांनी स्वरचित पोवाड्यातून भालेरावनगर-पाटीलगढीची एकजूट, गुणवंत विद्यार्थी व सन्मानार्थींचे कौतुक केले. यावेळी कॉलनीतील ज्येष्ठ, महिला, तरुण व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्षीय मनोगतात गोकुळ पाटील यांनी विद्यार्थ्यांना “दहावी-बारावी ही एक शर्यत जिंकली असली, तरी खरी शर्यत आता सुरू झाली आहे,” असा प्रेरणादायी संदेश देत शिस्त, वेळेचे नियोजन, वाचन, चांगली संगत आणि सातत्यपूर्ण मेहनतीचे महत्त्व पटवून दिले. तसेच सेवानिवृत्त शिक्षकांनी निवृत्तीनंतरही ज्ञानदान व समाजसेवेची दुसरी इनिंग सुरू ठेवावी, आरोग्याची काळजी घ्यावी आणि कुटुंबाला वेळ द्यावा, असे आवाहन केले. दाते महेश देशमुख यांनी कॉलनीच्या एकजुटीचे कौतुक करत यापुढेही गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी तसेच सेवानिवृत्त व विशेष पुरस्कारप्राप्त व्यक्तींना सन्मानित करण्याची ग्वाही दिली. गंगाधर अहिरराव यांनीही स्वखर्चाने सेवानिवृत्त बंधू-भगिनींचा सत्कार केला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!