आश्रमशाळेच्या परिसरात विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; वन्यप्राण्याच्या हल्ल्याची शक्यता, परिसरात खळबळ

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261105-WA0432

आश्रमशाळेच्या परिसरात विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; वन्यप्राण्याच्या हल्ल्याची शक्यता, परिसरात खळबळ

 

मार्मिक न्यूज नेटवर्क : नंदुरबार.

तालुक्यातील एका आश्रमशाळेच्या परिसरात विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पहाटेच्या सुमारास समोर आली. सकाळी साधारण सहा वाजता शाळेच्या परिसरात तैनात असलेल्या चौकीदाराला एक विद्यार्थी गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. विद्यार्थ्याच्या गळ्याच्या भागावर गंभीर जखमा होत्या आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेला होता. चौकीदाराने तातडीने मुख्याध्यापक माळी यांना माहिती दिल्यानंतर विद्यार्थ्याला उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने आश्रमशाळा परिसरात एक

विद्यार्थ्याला नेमक्या कोणत्या परिस्थितीत गंभीर जखमा झाल्या, तो पहाटे शाळेच्या परिसरात जखमी अवस्थेत कसा आढळला, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, एखाद्या हिंस्त्र वन्यप्राण्याच्या हल्ल्यात विद्यार्थी जखमी झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र हा हल्ला बिबट्याने केला की अन्य कोणत्या वन्यप्राण्याने, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्याच्या मृत्यूमागचे नेमके गूढ काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Screenshot_2026-11-04-10-47-41-24_99c04817c0de5652397fc8b56c3b3817

घटनेची गंभीर दखल घेत वनविभाग आणि प्रशासनाने तपासाला सुरुवात केली असून घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि वन्यप्राण्यांच्या हालचालींची पडताळणी केली जात आहे. तपासातूनच विद्यार्थ्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, निवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी, रात्रीची गस्त आणि सुरक्षाव्यवस्थेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या घटनेनंतर प्रशासनाकडून अधिक खबरदारी घेण्याची मागणी होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!