नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

अपनी भाषा में पढ़े! Translate

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767

नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

 

 

अमळनेर : विक्की जाधव. 

महाभारतात दुर्योधनाच्या आजूबाजूला पितामह भीष्म, गुरू द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि विदुर यांच्यासारखे अनुभवी, हितचिंतक व्यक्तिमत्त्व होते. मात्र, दुर्योधनाने सत्य सांगणाऱ्यांपेक्षा आपल्या मनासारखे बोलणाऱ्या शकुनीचे ऐकणे पसंत केले आणि त्याचाच परिणाम त्याच्या विनाशात झाला. 

अमळनेर च्या राजकारणातही हीच परिस्थिती निर्माण झाली तर??

सत्तेचा अहंकार आणि चुकीच्या सल्लागारांचा प्रभाव किती महागात पडू शकतो, याचे चित्र अमळनेरच्या नगरपालिकेतील सध्याच्या राजकीय घडामोडींवरून दिसू लागले आहे. माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या उपस्थितीत झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीनंतर अनेक नगरसेवकांनी खदखद व्यक्त केलेली नाराजी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

 

५० चे टोकन अन् हल्दीरामचे पॅकेट; कार्यकर्त्यांच्या नाराजीवर मिठाईचा मुलामा?

गेल्या अनेक दिवसांपासून मनात साचलेली खदखद अखेर बाहेर आली. ‘५०चे टोकन आणि ५० ची मिठाई, तुमची दिवाळी आनंदात जावो!’ 

अशा उपरोधिक शब्दांत नगरसेवकांनी आपली नाराजी व्यक्त केली.

माजी आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर नगरसेवक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेमके काय मिळाले, तर हल्दीरामचे पॅकेट! असा टोला लगावत एका नगरसेवकांने दुर्योधनाचे डोळे उघडण्यासाठी कोणीतरी हा डाव मांडला आहे, त्यामागे अनेक दिवसांपासून साचलेल्या राजकीय असंतोषाचे प्रतिबिंब असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

 

सत्तेच्या खुर्चीवर बसलेले नगरसेवक, पण मनात मात्र असंतोषाचे वादळ!

नगरपालिकेत सत्ता असूनही सत्ताधारी गटातील नगरसेवकांमध्ये एकमताचा अभाव असल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. अनेक महिन्यांपासून सुरू असलेली चलबिचल, नाराजी, अंतर्गत मतभेद आणि एकमेकांवरील अविश्वास ह्या गोष्टी आम्हीच सांभाळून घेत होतो परंतु आता (आम्हाला ) सत्ताधारी असताना देखील सत्ता टिकवण्यासाठी काट्याचा संघर्ष करावा लागत आहे. अपक्ष निवडून आलेल्या काही नगरसेवकांनी दुसऱ्या गटाशी जवळीक साधल्याच्या चर्चांनाही राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या कार्यपद्धतीबाबतही काही नगरसेवकांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जाते. मात्र, प्रत्यक्ष बैठकीत किंवा सार्वजनिकरीत्या स्पष्ट भूमिका मांडण्याऐवजी अनेकजण माघे बोलतात अन, समोर मौन बाळगणे पसंत करत असल्याचे चित्र आहे. कारण प्रत्येकालाच राजकीय समीकरणे सांभाळायची आहेत, हेही तितकेच खरे!

 

शब्द दिले, आश्वासने दिली; मग ती पूर्ण करण्याची वेळ आली तेव्हा मौन का? अमळनेर च्या फेऱ्या ही झाल्या कमी? 

निवडणुकीच्या काळात अनेकांनी मोठा आर्थिक खर्च करून राजकीय मैदानात उडी घेतली. कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, नगरसेवकांनी जनतेला आश्वासने दिली आणि सत्तेच्या माध्यमातून विकासकामे होतील, अशा अपेक्षा निर्माण झाल्या. मात्र, सत्तेत आल्यानंतर दिलेले शब्द आणि प्रत्यक्षात घडणाऱ्या गोष्टी यांच्यात अंतर वाढत असल्याची नाराजी काही नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. काहींच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, तर काहींना आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याची भावना आहे. बैठकीत काही कार्यकर्त्यांनी तडकाफडकी आमचाही राजीनामा घ्या, आम्हाला आता काम करायचे नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. काही कार्यकर्ते शिवसेनेला रामराम ठोकून ‘एकला चलो’ची भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात आहे. जर कार्यकर्त्यांचाच विश्वास ढासळत असेल, तर पुढील निवडणुकीत नेत्यांच्या मागे उभे राहणार कोण, हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

 

पितामह भीष्मांची भूमिका नेमकी कोणाची ? सत्य दिसत असूनही मौन का?

महाभारतात भीष्म पितामहांनी अनेक चुकीच्या घडामोडी आपल्या डोळ्यांसमोर घडताना पाहिल्या; मात्र त्यांची भूमिका अनेकदा प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडली. अमळनेरच्या राजकारणातही काही अनुभवी नेते केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दुसरीकडे, शकुनी कोण आहे, त्याचा डाव काय आहे आणि कोणाच्या मनातील विचारांना कोण खतपाणी घालत आहे, याचा प्रत्येकाने स्वतःच्या अंतरात्म्याला विचार करून आत्मपरीक्षण करावे, असा मार्मिक चां सल्ला आहे.

नगराध्यक्ष, माजी आमदार, नगरसेवक, पक्षाचे कार्यकर्ते, अपक्ष आणि विरोधी गट या सर्वांच्या राजकीय भूमिकांकडे आता शहराचे लक्ष लागले आहे. या सत्तासंघर्षात काहींचे मौन, काहींची नाराजी आणि काहींची बदलती भूमिका भविष्यातील राजकीय समीकरणे बदलू शकते. बघूया… दिवाळीत कोण सुतळी बॉम्ब फोडतो किंवा कोण लोंगी फटका…

 

शकुनीचा डाव यशस्वी होणार की दुर्योधनाचे डोळे उघडणार?

एकीकडे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची चर्चा, दुसरीकडे सत्ताधाऱ्यांना सत्ता टिकवण्याची कसरत आणि तिसरीकडे विरोधकांसाठी निर्माण होणारी राजकीय संधी, असे अमळनेरच्या राजकारणाचे चित्र दिसू लागले आहे. आज जे कार्यकर्ते आणि नगरसेवक सत्तेच्या पाठीशी उभे आहेत, त्यांनाच उद्या दूर जावेसे वाटू लागले तर त्याची जबाबदारी कोण घेणार? दिवाळीच्या मिठाईच्या डब्ब्याने मनातील नाराजी गोड होणार नाही आणि ५० हजाराच्या टोकनने दिलेल्या शब्दांची किंमत ठरवता येणार नाही. कारण राजकारणात कार्यकर्त्यांना केवळ सणासुदीला मिठाई नको असते, तर त्यांच्या विश्वासाला, स्वाभिमानाला आणि शब्दाला किंमत हवी असते. दुर्योधनाला सत्य सांगणारे नकोसे वाटले आणि शकुनीचे बोलणे गोड वाटले, तर त्याची किंमत संपूर्ण कौरवकुळाला मोजावी लागेल.

त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी वेळीच आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. अन्यथा आज हातात मिठाईचे बॉक्स घेऊन शांत असलेले कार्यकर्ते उद्या राजकीय मैदानात वेगळीच भूमिका घेताना दिसले, तर आश्चर्य वाटायला नको. कारण सत्ता टिकवण्यासाठी संख्याबळ पुरेसे नसते; विश्वास, निष्ठा आणि दिलेला शब्द पाळण्याची ताकदही लागते!

 तूर्तास मार्मिक. सविस्तर पुढे देऊचं…

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!