नागपूर संविधान चौकात धोबी समाजाचे बेमुदत आमरण उपोषण सुरू; आरक्षणासाठी ठाम लढा

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-10-27 at 1.09.16 PM

नागपूर संविधान चौकात धोबी समाजाचे बेमुदत आमरण उपोषण सुरू; आरक्षणासाठी ठाम लढा

नागपूर, दि. २७ ऑक्टोबर २०२६ – महाराष्ट्र धोबी (परीट) समाज आरक्षण समन्वय समितीच्या वतीने आज नागपूर येथील संविधान चौकात बेमुदत आमरण आणि साखळी उपोषणाला सुरुवात झाली. आज उपोषणाचा पहिला दिवस आहे.

या आंदोलनाला समाजबंधूंचा मोठा पाठिंबा मिळत आहे. समिती प्रमुख आशिष कदम, अध्यक्ष डी. डी. सोनटक्के, कार्याध्यक्ष राजेंद्रशेठ खैरनार, ज्येष्ठ मार्गदर्शक सुधीर खैरनार, युवा अध्यक्ष राहुल वराणकर, रेखताई कदम, मुरलीधर शिंदे, दिलीप शिंदे, सुनिल शिंदे आणि मुख्य महासचिव संतोष सवतिरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उपोषणाला अधिकृत प्रारंभ झाला.

आमरण उपोषणाला बसलेले पाच कार्यकर्ते:
बळवंतराव साळुंखे, ज्योतिबा दादासाहेब नन्नावरे, मनोहर चिंचोलकर, शंकर परदेशी आणि संतोष औढेंकर.

पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील हजारो समाजबंधव तसेच लक्षणीय संख्येने महिला भगिनी साखळी उपोषणाला बसले आहेत.

प्रमुख मागणी:
राज्य शासनाने गठीत केलेल्या डॉ. दशरथ भांडे समितीच्या तिसऱ्या शिफारशीनुसार SC प्रवर्गाच्या तत्सम सवलती तात्काळ लागू कराव्यात. धोबी, परीट, वरठी, रजक, वनी, मडवळ, मंडलेवार यांचा अनुसूचित जातीत समावेश होईपर्यंत अनुसूचित जातीला मिळणाऱ्या सर्व आरक्षणाच्या सोयी-सवलती ‘खास बाब’ म्हणून राज्य शासनाने त्वरीत द्याव्यात.

आंदोलकांनी “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा”, “एक धोबी… ४० लाख धोबी” आणि “तोपर्यंत माघार नाही” अशा जोरदार घोषणा दिल्या.

स्व. रमाकांतशेठ कदम (संस्थापक आरक्षण समिती) यांच्या विचारांनी प्रेरित होऊन हा लढा सुरू असून, समाज एकजुटीने आपला हक्क मिळवूनच राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

जय गोपाला | जय गाडगेबाबा | जय भीम | जय संविधान

WhatsApp Image 2026-10-27 at 1.08.52 PM

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!