देशमुख नगरात रस्त्याची दुरवस्था, दूषित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त! स्थानिकांनी केली आपले सरकारवर तक्रार दाखल.

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261027-WA0557

देशमुख नगरात रस्त्याची दुरवस्था, दूषित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त! स्थानिकांनी केली आपले सरकारवर तक्रार दाखल.

 

अमळनेर : विक्की जाधव.

पिंपळे रोड आणि ढेकू रोडदरम्यान असलेल्या देशमुख नगर परिसरात रस्त्याची दुरवस्था, दूषित पाणीपुरवठा आणि अपुऱ्या नागरी सुविधांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. भुयारी गटार योजनेच्या कामासाठी खोदलेला डांबरी रस्ता अद्याप दुरुस्त करण्यात आलेला नसून, नगरपरिषदेकडे वारंवार तक्रारी करूनही समस्यांचे निराकरण झाले नसल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. तातडीने उपाययोजना न केल्यास नगरपरिषदेवर येऊन आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

भुयारी गटार योजनेअंतर्गत पाइप टाकण्यासाठी परिसरातील डांबरी रस्ता खोदण्यात आला होता. मात्र, पाइप टाकण्याचे काम पूर्ण होऊन बराच कालावधी उलटला तरी रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. या रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याने विशेषतः रात्रीच्या वेळी अंधारात दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. परिसरात पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडत आहे. रस्त्याच्या समस्येबरोबरच देशमुख नगरात पिण्यासाठी अस्वच्छ व दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. नियमित कर, घरपट्टी आणि पाणीपट्टी भरूनही मूलभूत नागरी सुविधा मिळत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात अनेक नागरिकांनी आपले सरकार पोर्टलवर तक्रार देखील दाखल केली आहे. या परिसरात दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक वास्तव्यास आहेत. खराब रस्ते, खड्डे आणि अपुऱ्या सुविधांमुळे त्यांना दैनंदिन ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक नगरसेवकांकडे समस्या मांडून तसेच नगरपरिषदेत आणि ऑनलाइन तक्रार निवारण प्रणालीद्वारे तक्रारी नोंदवूनही अद्याप ठोस कार्यवाही झाली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!