किनगाव दंगलीतील जखमी पोलीस अंमलदारांची पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडून रुग्णालयात भेट

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261027-WA0137

किनगाव दंगलीतील जखमी पोलीस अंमलदारांची पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडून रुग्णालयात भेट

 

मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव.

किनगाव येथे काही दिवसांपूर्वी दोन गटांत झालेल्या वादातून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लाठीचार्ज आणि दगडफेकीदरम्यान जखमी झालेल्या दोन पोलीस अंमलदारांची जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी जखमी कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करत त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली. कर्तव्य बजावताना जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस केल्याने पोलीस दलातील सहकाऱ्यांप्रती असलेली संवेदनशीलता अधोरेखित झाली.

या घटनेत यावल पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस असलेले पोलीस नाईक क्रमांक ३३९५ पुरुषोत्तम पाटील यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले असून, त्यांच्यावर जळगाव येथील आरुषी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर पोलीस मुख्यालयातील आरसीपी पथकात नेमणुकीस असलेले पोलीस शिपाई क्रमांक ०२९९ दानिश हारून तांबोळी यांच्या कमरेला दगड लागल्याने दुखापत झाली आहे. त्यांच्यावर जळगाव येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. किनगाव येथील घटनेदरम्यान कर्तव्य बजावत असताना दोन्ही अंमलदार जखमी झाल्याने पोलीस दलात या घटनेची दखल घेण्यात आली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!