हिंगोणे खु प्र ज येथे महर्षी वाल्मीक जयंती उत्साहात साजरी

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261027-WA0520

हिंगोणे खु प्र ज येथे महर्षी वाल्मीक जयंती उत्साहात साजरी

 

महर्षी वाल्मीक मित्र मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

अमळनेर : विक्की जाधव.

हिंगोणे खु प्र ज येथे महर्षी वाल्मीक मित्र मंडळाच्या वतीने महर्षी वाल्मीक जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी महर्षी वाल्मीक यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. महर्षी वाल्मीक यांच्या जीवनकार्याचा आणि विचारांचा गौरव करत त्यांच्या आदर्शांचे पालन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. जयंतीनिमित्त गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या कार्यक्रमात मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ आणि समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महर्षी वाल्मीक यांच्या विचारांचा प्रसार व्हावा आणि समाजात एकता, बंधुभाव व सामाजिक सलोखा वाढावा, हा या जयंती उत्सवामागील उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!