अमळनेर आगाराच्या कामामुळे बससेवेत बदल; प्रवाशांनी पर्यायी थांब्यांची संत गाडगे बाबा चौक पाच पावली मंदिर येथून व्यवस्था.
अमळनेर : विक्की जाधव.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगारात काम सुरू असल्यामुळे लांब पल्ल्याच्या सर्व बस अमळनेर आगारातून, तर ग्रामीण भागातील फेऱ्या पाचपावली मंदिराजवळील नवीन प्रशासकीय इमारतीच्या मागील परिसरातून सुटणार आहेत. या बदलामुळे प्रवाशांनी बस पकडण्यासाठी निघताना संबंधित बसचा सुटण्याचा ठिकाणाचा बदल लक्षात घेणे आवश्यक आहे.
अमळनेर आगारातील सुरू असलेल्या कामामुळे बसच्या सुटण्याच्या ठिकाणात बदल करण्यात आल्याची माहिती प्रवाशांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनेतून देण्यात आली आहे. विशेषतः ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांनी पाचपावली मंदिराजवळील नवीन प्रशासकीय इमारतीच्या मागील परिसरात बसची प्रतीक्षा करावी. लांब पल्ल्याच्या प्रवाशांनी मात्र अमळनेर आगारातूनच बस पकडावी, असे सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.
बससेवेतील या बदलामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी नागरिकांनी प्रवासापूर्वी बस सुटण्याचे ठिकाण निश्चित करून घ्यावे. तसेच वेळेचे नियोजन करून निर्धारित ठिकाणी वेळेत पोहोचावे, असे आवाहन करण्यात येत आहे. आगारातील काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांनी या सूचनेची नोंद घेऊन एसटी महामंडळाच्या प्रशासनाला सहकार्य करावे.