करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

अपनी भाषा में पढ़े! Translate

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. करमाळा शहरात अशा प्रकारच्या कार्यानुभव विषयाची स्पर्धा प्रथमच घेतल्यामुळे संपूर्ण शहरात या उपक्रमाची जोरदार चर्चा सुरू असून पालकांकडून त्याचे भरभरून कौतुक होत आहे.

नगराध्यक्षा  मोहिनी सावंत, उपनगराध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती अतुल फंड आणि नगरसेवक तथा गटनेते संजय सावंत यांच्या प्रेरणेतून, तसेच मुख्याधिकारी सचिन तपसे व प्रशासन अधिकारी जयवंत नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्रसमन्वयक विक्रम राऊत यांच्या समन्वयातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेवक संजय सावंत आणि उपनगराध्यक्ष अतुल फंड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना संजय सावंत म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थी योग्य मार्गाने घडतात आणि यश संपादन करतात.”

तर “अशा स्पर्धांमुळे मोठे कलाकार तयार होतात, ही काळाची गरज असून याद्वारे विद्यार्थी सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभे राहतात,” असे मत अतुल फंड यांनी व्यक्त केले. नगरसेवक सचिन घोलप आणि विजय घोलप यांनीही स्पर्धेला सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.

ही स्पर्धा दोन टप्प्यांत घेण्यात आली. प्रथम शाळा स्तरावर स्पर्धा घेऊन प्रत्येक श्रेणीतून सर्वोत्तम ३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर झालेल्या केंद्रस्तरीय स्पर्धेत एकूण ६३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. गटनिहाय स्पर्धा पुढीलप्रमाणे पार पडली १ ली व २ री: पणती रंगवणे, ३ री व ४ थी: आकाशकंदील तयार करणे, ५ वी व ६ वी: ग्रीटिंग कार्ड तयार करणे.

सर्व विद्यार्थी अत्यंत आनंदात व उत्साहात पणत्या रंगवणे, आकाशकंदील आणि आकर्षक ग्रीटिंग कार्ड बनवण्याच्या कलेत तल्लीन झाले होते.

स्पर्धेचे परीक्षण सौ. अनिता व्हटकर, सौ. तृप्ती ठिगळे आणि अनिल गावित यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रसमन्वयक विक्रम राऊत यांनी केले, तर आभार प्रदर्शन बलभीम शिंदे यांनी मानले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपालिकेतील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!