अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261029-WA1351

अमळनेरच्या फार्मसी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

 

अमळनेर : विक्की जाधव.

विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि त्यांना वेळेत आरोग्य तपासणीची सुविधा मिळावी, या उद्देशाने अमळनेर येथील स्व. बी. पी. सी. भांडारकर कॉलेज ऑफ डी. फार्मसी व स्व. प्रा. आर. के. कैले कॉलेज ऑफ बी. फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. खांदेश शिक्षण मंडळ व समर्थ युवा फाउंडेशन यांच्या पाठबळातून आयोजित या शिबिरात १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला. रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण, हिमोग्लोबिन, रक्तगटासह डोळे व दातांची तपासणी करण्यात आली. आधुनिक वैद्यकीय सुविधांचा वापर करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची प्राथमिक तपासणी करण्यात आल्याने या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेणे ही त्यांच्या सर्वांगीण विकासाची महत्त्वाची गरज आहे. याच जाणिवेतून आयोजित शिबिरात विद्यार्थ्यांना विविध आरोग्य समस्यांची माहिती देण्यात आली. विशेषतः डोळ्यांच्या तपासणीद्वारे दृष्टीसंबंधी समस्या ओळखणे, दातांच्या तपासणीद्वारे मौखिक स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगणे आणि नियमित आरोग्य तपासणीची सवय लावणे यावर भर देण्यात आला. खांदेश शिक्षण मंडळाचे चेअरमन योगेशजी मुंदडे, महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. डॉ. माधव बाघ तसेच प्राचार्य डॉ. धनंजय पाटील यांनी या उपक्रमासाठी मार्गदर्शन केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. सतीश बारगुजे व प्रा. वैभव पाटील यांनी नियोजन व समन्वयाची जबाबदारी सांभाळली.

शिबिराच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम केवळ तपासणीपुरता मर्यादित न राहता आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणारा ठरला. शिक्षणासोबतच आरोग्य संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे विशेष महत्त्व अधोरेखित झाले. भविष्यातही अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना आरोग्याबाबत अधिक सजग करण्याचा संदेश या शिबिरातून देण्यात आला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!