अंमळनेर तालुक्यातील जळोद मध्ये घरफोडी -1 लाख 80 हजार कॅश व सोने लंपास
अमळनेर : विक्की जाधव.
जळोद गावातील श्री. जवाहरलाल भोई (माजी उपसरपंच) यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने शेती च्या खत साठी ठेवलेले 1लाख 80 हजार रुपये कॅश व सोने असा ऐवज लंपास केला आहे.
चोरट्याने घरात दुसरीकडे कुठेही हात न लावता, बरोबर जिथे रोख रक्कम आणि सोने ठेवले होते तिथेच डल्ला मारला. त्यामुळे ही चोरी जवळच्या माहितगार व्यक्तीनेच केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहे