न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

WhatsApp Image 2026-11-02 at 7.53.54 PM बारामतीत खळबळ! कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली ५ घातक शस्त्रे; चार आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमित शहांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; अमळनेरचे आमदार अनिल पाटलांना मुंबईतून बोलावणं!

 

अमळनेर : विक्की जाधव.

अजित पवार गटाच्या नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक होण्यापूर्वी मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. दुसरीकडे, माजी मंत्री तथा अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांना तातडीने मुंबईत बोलावण्यात आल्याने त्यांच्या राजकीय वाटचालीबाबतच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

IMG-20261102-WA0736

छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक होणार असल्याची माहिती आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंत्रिमंडळ फेरबदल आणि पक्षातील नव्या नियुक्त्यांबाबतही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे अनिल पाटील यांना मुंबईतून आलेल्या बोलावण्याला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे.

IMG-20261103-WA0997

दरम्यान, मुंबईला रवाना होण्यापूर्वी अनिल पाटील यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेण्यासाठी आपण जात असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळात कोणाला संधी द्यायची, याबाबत संबंधित पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेत असतात. अमित शहा यांच्याकडे मंत्र्यांच्या कामकाजासंदर्भात चर्चा होत असेल, असे आपल्याला वाटत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांनी अडीच वर्षांनंतर मंत्रिमंडळात फेरबदल करून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा शब्द दिला होता. आता हा शब्द पूर्ण करण्याबाबत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली निर्णय होण्याची शक्यता असल्याने अनिल पाटील यांच्या मुंबई दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!