साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर मध्ये पर्यावरण पूरक विविध शैक्षणिक उपक्रम
अमळनेर : विक्की जाधव.
साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये दिनांक 3 / 11/ 2026.वार मंगळवार रोजी पर्यावरण पूरक असे विविध उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव मा. श्री. दादासाहेब. संदीप घोरपडे होते.

व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष मा. आबासाहेब श्री हेमकांत पाटील मुख्याध्यापक श्री डी.ए.धनगर सर ज्येष्ठ शिक्षक श्री जे एस पाटील दिलीप पाटील सर श्री देशमुख सर श्री मुकेश पाटील सर सौ वंजारी मॅडम श्रीमती. वानखेडे मॅडम श्री महाजन सर उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवरांनी प्रतिमेचे पूजन केले कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थिनींना फटाके मुक्त दिवाळी साजरी करणे व जलसंवर्धन याविषयी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.नेहा पाटील, रेणुका लाड, वैभव पवार,भाग्यश्री पाटील, इत्यादी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री. मुकेश पाटील सर यांनी विद्यार्थिनींना फटाके मुक्त दिवाळी साजरी करणे व जलसंवर्धन याविषयी प्रतिज्ञा दिली. अध्यक्षीय भाषणात संस्थेचे सचिव मा. दादासाहेब श्री. संदीप घोरपडे सर म्हणाले की पिण्याचे पाण्याचे प्रमाण भूतलावर खूप कमी आहे . म्हणून आपण पाण्याचे नियोजन करू या. पुढील महायुद्ध हे पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे . म्हणून आपण आजच पाण्याची बचत करू या. दिवाळीत आपण ज्ञानाचा दिवा लावू आणि अंधश्रद्धांचा अंधार दूर करूया. फटाके मुक्त दिवाळी साजरी करू या. तुम्ही खूप छान शैक्षणिक उपक्रम राबविला त्याबद्दल तुमचे अभिनंदन.
शाळेचे मुख्याध्यापक श्री .डी .ए धनगर . सर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले आपण सण उत्सव साजरा करण्याची पद्धत बदलावी लागेल . समाजामध्ये एकमेकांविषयी संवेदना संपत चालली आपण आनंद साजरा करायचा पण दुसऱ्याला त्रास होऊ नये . असा. म्हणून आपण आज फटाके मस्त दिवाळी साजरी करूया व जलसंवर्धन करू या व जल बचत करूया.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री . दिलीप पाटील सर व आभार श्री . जे . एस .यांनी मानले .