कापूस आयात शुल्क कपात निर्णयाविरोधात शेतकऱ्यांचा संताप; जीआरची होळी करून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261106-WA1169

कापूस आयात शुल्क कपात निर्णयाविरोधात शेतकऱ्यांचा संताप; जीआरची होळी करून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन.

 

अमळनेर : विक्की जाधव.

केंद्र सरकारने कापूस आयातीवरील शुल्क कमी केल्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत कापसाचे भाव घसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शासन निर्णयाच्या (जीआर) प्रतीची होळी करून केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.

IMG-20261102-WA0736

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने कापसाचे पीक घेतले असून, उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत आहे. मात्र, कापसाला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत कापूस आयातीवरील शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे देशांतर्गत कापसाच्या बाजारभावावर विपरीत परिणाम होत असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

Screenshot_2026-11-04-10-47-41-24_99c04817c0de5652397fc8b56c3b3817

सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून आयात शुल्क कपातीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, कापसाला योग्य व हमीभाव मिळावा आणि शेतकऱ्यांना आर्थिक न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शरद पाटील, संदीप पाटील, कृष्णा पाटील, भूषण कोळी,उमेश पाटील, योगेश कोळी गुलाब पाटील, प्रकाश बोरसे, गणेश पाटील, विजय पाटील कार्यकर्ते व कापूस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!