शेतीत वडिलांचा संघर्ष, मुलाने गाठले यशाचे शिखर! महेश पाटील यांची तरुणांसाठी प्रेरणादायी कहाणी..

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261105-WA0570(1)

शेतीत वडिलांचा संघर्ष, मुलाने गाठले यशाचे शिखर! महेश पाटील यांची तरुणांसाठी प्रेरणादायी कहाणी..

 

मार्मिक समाचार

रंजाने गावच्या महेश पाटील यांची नाशिकमध्ये व्यावसायिक भरारी; वडिलांच्या कष्टाचे चीज करत तरुणांसमोर ठेवला संघर्ष, जिद्द आणि यशाचा आदर्श!

राजकारणाच्या मैदानात प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतलेल्या अमळनेर तालुक्यातील रंजाने गावच्या एका उच्चशिक्षित तरुणाने आज नाशिकसारख्या मोठ्या शहरात आपल्या व्यावसायिक यशाचा ठसा उमटवला आहे. महेश रमेश पाटील असे या जिद्दी तरुणाचे नाव! शिक्षण, मेहनत, आत्मविश्वास आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय या बळावर त्यांनी फार्मसी क्षेत्रात स्वतःचा मेडिकल व्यवसाय उभा करून अल्पावधीतच उल्लेखनीय प्रगती साधली आहे. विशेष म्हणजे, ज्या तरुणाच्या मनात एकेकाळी राजकारणाची आवड होती, त्याच तरुणाने आज व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे रंजाने गावासह अमळनेर तालुक्यातील तरुणांसाठी महेश पाटील यांचा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे.

Screenshot_2026-11-04-10-47-41-24_99c04817c0de5652397fc8b56c3b3817

महेश पाटील यांच्या यशामागे सर्वात मोठा वाटा आहे तो त्यांचे शेतकरी पार्शभूमी असलेले त्यांचे वडील रमेश झुलाल पाटील यांच्या कष्टाचा आणि त्यागाचा! अमळनेरपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या रंजाने -तासखेडे गाव वडिलांनी आपल्या शेतीत अहोरात्र राबून संसाराचा गाडा ओढला. उन्हातान्हात घाम गाळत, रक्ताचे पाणी करून त्यांनी मुलाच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. परिस्थिती सर्वसाधारण असतानाही मुलाच्या स्वप्नांना मर्यादा येऊ दिल्या नाहीत. वडिलांनी शेतात घाम गाळला आणि मुलाने आपल्या कर्तृत्वाने त्या घामाचे चीज केले, हीच या यशोगाथेची खरी ताकद आहे.

महेश पाटील यांच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी वेळेनुसार स्वतःच्या प्राधान्यक्रमात केलेला बदल! महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राजकारणात एका पक्षासाठी काम करताना त्यांना काही प्रमाणात प्रसिद्धीही मिळाली होती. मात्र, केवळ प्रसिद्धीच्या मागे न धावता शिक्षण आणि भविष्यातील स्थैर्य यांना अधिक महत्त्व देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर फार्मसी क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून व्यवसाय उभारण्याच्या दिशेने पावले टाकली. नाशिकसारख्या मोठ्या शहरात स्पर्धेच्या वातावरणात स्वतःचे स्थान निर्माण करणे सोपे नव्हते; मात्र सातत्य, मेहनत आणि व्यवसायाप्रती असलेली बांधिलकी यांच्या जोरावर त्यांनी अल्पावधीतच चांगली प्रगती साधली. एका छोट्याशा गावातून आलेला तरुण मोठ्या शहरात स्वतःच्या हिमतीवर व्यवसायाची ओळख निर्माण करू शकतो, हे महेश यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!