वसुबारसनिमित्त मंगळग्रह मंदिरात गोमाता-गोवत्साचे विधिवत पूजन

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261105-WA0590

वसुबारसनिमित्त मंगळग्रह मंदिरात गोमाता-गोवत्साचे विधिवत पूजन..

 

अमळनेर : विक्की जाधव.

मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी वसुबारस (गोवत्स द्वादशी) भक्तिभावात साजरी करण्यात आली. यानिमित्त मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले व त्यांच्या धर्मपत्नी सौ. आशाताई महाले यांच्या शुभहस्ते गोमाता व गोवत्साचे पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजन करण्यात आले.

IMG-20261104-WA1132

यावेळी गोमातेचे पूजन करून तिची आरती करण्यात आली. हिंदू संस्कृतीत गोमातेला असलेले धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करणारा हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. मंदिर परिसरात यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त, सेवेकरी तसेच पुरोहित उपस्थित होते.

IMG-20261102-WA0736

याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा यांच्यासह मंदिराचे पुरोहित व सेवेकरी उपस्थित होते.

दरम्यान, दिवाळीनिमित्त मंगळग्रह सेवा संस्थेच्या वतीने मंदिरातील सेवेकऱ्यांना फराळाचे वाटपही करण्यात आले. डॉ. डिगंबर महाले व समस्त विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत सेवेकऱ्यांना दिवाळी फराळ देऊन त्यांचा सण आनंदात साजरा करण्यात आला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!