उजनी धरणावर येणारे AI डेटा सेंटर: रस्त्यावरील संघर्षासोबत न्यायालयीन लढाईही आवश्यक – संजय (बापू) घोलप

अपनी भाषा में पढ़े! Translate

375f67d5-1a3f-4d73-a3ae-1cc45f7bec5b

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- उजनी धरणावर येऊ घातलेल्या AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) डेटा सेंटरच्या विरोधात शेतकऱ्यांनी आणि स्थानिक जनतेने पुकारलेली रस्त्यावरील लढाई पूर्णपणे योग्यच आहे. मात्र, केवळ आंदोलनावर न थांबता याविरोधात न्यायालयीन लढाई लढणेदेखील तितकेच आवश्यक आहे, असे मत मनसे करमाळा तालुकाध्यक्ष संजय (बापू) घोलप यांनी व्यक्त केले.

केवळ आंदोलनाने हा प्रश्न सुटणार नाही, तर कायदेशीर आणि न्यायालयीन चौकटीत बाजू भक्कम मांडून हा लढा शेवटास नेणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन घोलप यांनी केले.
या लढ्यात शेतकऱ्यांची बाजू भक्कम असून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रमुख नेतृत्व याविरोधात एकवटले आहे. आमदार रोहितदादा पवार, खासदार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ नेते आणि शुभचिंतक शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.
संजय घोलप पुढे म्हणाले की, “जेव्हा एवढे मोठे नेतृत्व आणि सर्वपक्षीय पाठबळ शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, तेव्हा आपला विजय निश्चितच होणार आहे. गरज पडल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे स्वतः या लढ्यासाठी मैदानात उतरतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थिती चिंता करण्याचे कारण नाही, हा लढा आपण जिंकणारच.”

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!