उपोषणाचा दणका अन् प्रशासनाचा सज्जड दम; खानदेश शिक्षण मंडळाच्या प्राध्यापक भरतीला ब्रेक!

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261107-WA0684

उपोषणाचा दणका अन् प्रशासनाचा सज्जड दम; खानदेश शिक्षण मंडळाच्या प्राध्यापक भरतीला ब्रेक!

 

अमळनेर : विक्की जाधव.

खानदेश शिक्षण मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या प्राध्यापक भरती प्रक्रियेवरून आता शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सहाय्यक सहसंचालक कार्यालयाची कोणतीही प्रशासकीय पूर्वपरवानगी न घेताच भरती प्रक्रिया राबविण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे १३ ते १८ नोव्हेंबरदरम्यान नियोजित मुलाखतींचे नियोजन करण्यात आले होते. मात्र प्रशासनाच्या भूमिकेमुळे या मुलाखती आता स्थगित अथवा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

IMG-20261106-WA1284

या प्रकरणाविरोधात उपोषणकर्ते दिलीप जैन यांनी आक्रमक भूमिका घेत भरती प्रक्रिया तात्काळ रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच खानदेश शिक्षण मंडळाची विद्यमान कार्यकारिणी धर्मदाय आयुक्तांच्या ‘शेड्यूल एक’नुसार अधिकृत नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता. दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर सहाय्यक संचालक डॉ. पराग मसराम यांनी दिलीप जैन यांना अधिकृत लेखी पत्र दिले. प्रशासनाकडून कारवाईची दखल घेतल्याने अखेर जैन यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले.

file_00000000d9508211944bf76a55e325c4

प्रताप महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पदांच्या भरतीसंदर्भात संस्था किंवा महाविद्यालयाकडून संबंधित सहाय्यक सहसंचालक कार्यालयाशी कोणताही पत्रव्यवहार झालेला नसल्याचे तपासात स्पष्ट झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आवश्यक प्रशासकीय पूर्वपरवानगीशिवाय मुलाखती जाहीर करून भरती प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकारामुळे भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि नियमांचे पालन यावार गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, शासन नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी भरती प्रक्रियेबाबत नियमानुसार स्वतंत्र पत्रव्यवहार करून आवश्यक ती सर्व पूर्तता करणे मंडळासाठी बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पुढील निर्णय कळविला जाणार असल्याने १३ ते १८ नोव्हेंबरच्या मुलाखतींचे काय होणार, याकडे आता उमेदवारांसह शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे. विनापरवानगी भरतीचा हा प्रकार नेमका कुठपर्यंत जातो आणि प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. एवढेच नव्हे तर या लुटारू गँगवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी सर्वत्र मागणी होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!