महेंद्र बोरसे म्हणजे संघर्ष, जिद्द आणि जनसेवेचे तळमळ असणारे नेतृत्व 

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261107-WA0847

महेंद्र बोरसे म्हणजे संघर्ष, जिद्द आणि जनसेवेचे तळमळ असणारे नेतृत्व.

 

अमळनेर : विक्की जाधव.

संघर्ष, जिद्द आणि जनसेवेची तळमळ यांना आपल्या कार्याची ओळख बनवत महेंद्र बोरेसे यांनी अमळनेर तालुक्यातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवला आहे. दुर्गम भागातील गावात जन्मलेले बोरेसे यांनी लहान वयापासूनच सामाजिक प्रश्न जवळून अनुभवले. गावातील नदिवर पूल नसल्याने होणारी गैरसोय असो, पावसाळ्यात संपर्क तुटण्याचा प्रश्न असो किंवा मूलभूत सुविधांसाठीची धडपड असो, प्रत्येक प्रश्नावर त्यांनी रस्त्यावर उतरून संघर्षाची भूमिका घेतली. अभ्यासू वृत्ती, प्रभावी वक्तृत्व आणि प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची हातोटी यामुळे त्यांनी जनतेच्या मनात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.

केवळ आंदोलन करून थांबणे नव्हे, तर प्रश्नांचा सखोल अभ्यास करून प्रशासनाकडून त्यावर तोडगा काढून घेणे, ही महेंद्र बोरेसे यांच्या कार्याची खासियत मानली जाते. संघर्षातून नियम बदलण्याची ताकद आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याची जिद्द त्यांच्या आजवरच्या प्रवासातून दिसून येते. संकटाच्या काळात सर्वसामान्यांच्या पाठीशी उभे राहणे, त्यांच्या अडचणींना स्वतःची समस्या मानून लढा देणे आणि विकासाच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणे, यामुळे महेंद्र बोरेसे यांचे नेतृत्व अधिक ठळक झाले आहे. संघर्षातून माणूस घडतो आणि जिद्दीने नेतृत्व उभे राहते, याचे उदाहरण म्हणजे महेंद्र बोरेसे यांचा आजवरचा प्रेरणादायी प्रवास!

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!