ऋषी पंचमीला श्री मंगळग्रह मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260916-WA0584

ऋषी पंचमीला श्री मंगळग्रह मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

 

अमळनेर : विक्की जाधव.

ऋषी पंचमीच्या पावन पर्वानिमित्त मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी येथील श्री मंगळग्रह मंदिरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. श्री मंगळग्रह देवांसह मंदिर परिसरातील विविध देव-देवतांच्या मूर्तींच्या दर्शनासाठी तसेच पूजा-अभिषेक करण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भाविकांच्या उपस्थितीने मंदिर परिसर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला होता.

ऋषी पंचमीचे औचित्य साधत स्थानिकांसह परिसरातील भाविकांनी श्री मंगळग्रह देवांचे दर्शन घेत पूजा-अभिषेक केला. श्रद्धेने दर्शन घेताना भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि भक्तिभावाचे भाव दिसून येत होते. श्री मंगळग्रह देवांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने जमलेल्या भाविकांचे भावविभोर दृश्य दिवसभर मंदिर परिसरात भक्तीमय वातावरणाची अनुभूती देणारे ठरले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!