June 30, 2025 5:12 am

अबब:सरपंच पदासाठी 11 व सदस्य पदासाठी 91 अर्ज मदनवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दाखल, गाव पातळीवर नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज

अपनी भाषा में पढ़े! Translate

अबब:सरपंच पदासाठी 11 व सदस्य पदासाठी 91 अर्ज मदनवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दाखल, गाव पातळीवर नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज

(निलेश गायकवाड )

26 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडत आहे. काल शेवटची मुदत अर्ज दाखल करण्याची असल्याने इंदापूर तालुक्यातील युवकांनी व प्रस्थापितांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने विशेष मदनवाडी ग्रामपंचायतच्या वतीने सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत ग्रामपंचायत मध्ये पाच वार्ड साठी तेरा सदस्य व एक सरपंच अशी पदसंख्या असल्याने 13 जागेसाठी तब्बल 91 अर्ज व एक सरपंच जागेसाठी 11 अर्ज दाखल. मदनवाडीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असे चित्र दिसल्याने इंदापूर तालुक्यात सर्वत्र चर्चा होत आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणावर अर्ज आल्याने गावाच्या गाव कारभाऱ्यांवर व नेत्यांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे . नेमके एवढे अर्ज दाखल करण्याचे कारण अजून देखील स्पष्ट झालेले नाही. यामध्ये युवकांचा वाढता प्रभाव व प्रत्येक समाजातील व्यक्ती पुढे येताना दिसत आहे . यामध्ये असे म्हणावे लागेल की शुभ विचाराने समाज एकीकडे जागृत होऊन आपल्या मूलभूत हक्कांसाठी लढत आहे व पुढे येण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच्याच विरोधात भूमिका अशी म्हणावी लागेल की गाव कारभाऱ्यांवर व नेत्यांवर वाढती नाराजी दिसू लागली आहे . त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये काहींसाठी ही दिलासादायक बातमी व काहींसाठी धोक्याची घंटा पुढील होणाऱ्या मतदान रुपी आशीर्वादामध्ये मिळते की काय हे बघावे लागेल ….

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!