June 28, 2025 5:19 pm

हिंदी सक्तीविरोधात महाराष्ट्रात एकत्र मोर्चा! राज-उद्धव ठाकरे यांची बंधूभेट 5 जुलैच्या मराठी मोर्चात; पवारांचीही स्पष्ट भूमिका

अपनी भाषा में पढ़े! Translate

हिंदी सक्तीविरोधात महाराष्ट्रात एकत्र मोर्चा! राज-उद्धव ठाकरे यांची बंधूभेट 5 जुलैच्या मराठी मोर्चात; पवारांचीही स्पष्ट भूमिका

 

मार्मिक न्यूज नेटवर्क मुंबई,

राज्यातील शाळांमध्ये पहिली ते चौथीपर्यंत हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याच्या निर्णयावरून आता महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या निर्णयाविरोधात सर्व मराठी प्रेमी पक्ष आणि संघटना एकत्र येण्याची चिन्हं दिसत आहेत.

मराठी भाषेच्या संरक्षणासाठी 5 जुलै रोजी भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला असून या मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र सहभागी होणार आहेत. या मोर्चात दोन बंधूंमध्ये बऱ्याच वर्षांनंतर भेट होण्याची शक्यता असून, ही ‘बंधूभेट’ सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या मोर्चाची घोषणा करताना राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी म्हटलं, “हिंदीची सक्ती महाराष्ट्राला मान्य नाही. मराठी माणूस आता एकत्र येतोय.”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही यावर स्पष्ट भूमिका घेत सरकारला इशारा दिला आहे. “पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांवर हिंदी लादू नये. मातृभाषेचा अपमान सहन केला जाणार नाही,” असं सांगत पवार यांनी या मुद्यावर राज ठाकरे यांची भूमिका समजून घेण्याची तयारी दर्शवली आहे.

राजकीय आणि सामाजिक पातळीवर मराठीच्या हक्कासाठी लढा पुन्हा एकदा तेजस्वी होण्याची चिन्हं आहेत. 5 जुलैचा मोर्चा महाराष्ट्राच्या भाषिक अस्मितेसाठी निर्णायक ठरणार, हे निश्चित.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!