२६/११ च्या ताज्या झाल्या कटू आठवणी (फारुक जामदार यांनी प्रत्यक्ष अनुभवलेला थरारक प्रसंग)

अपनी भाषा में पढ़े! Translate

0c7dfb0d-b82d-4c15-8e37-09ef15e41c14

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):-आज २६ /११ च्या कटू आठवणी ताज्या झाल्या असून याबाबत करमाळ्यातील “आखो देखा हाल ” पाहिलेले येथील नागरिक फारुक जमादार यांच्याशी बातचीत करताना त्यांनी हादरून सोडणारा व आजही फरकात करणारा क्षण पुन्हा एकदा उदघोषित केला.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते फारूक जमादार म्हणाले की, मंत्रालयातील कामा निमित्त माझे मित्र माजी नगराध्यक्ष दिपक ओहोळ,साबीर तांबोळी मुंबई येथे गेलो होतो. सर्व कामे आटोपून व्हीटी रेल्वे स्टेशन वर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आलो. दरम्यान त्यावेळी माजी नगराध्यक्ष दीपक ओहोळ हे करमाळ्याला खाजगी वाहनाने गेले . यावेळी फारुक जमादार स्वतः व त्यांचे सहकारी साबीर तांबोळी हे दोघेच सी एस टी रेल्वे स्टेशन वर थांबले .सिध्देश्वर एक्स्प्रेसचे रिझर्व्हेशन असल्याने गाडी ला वेळ होता. जवळपास तीन तास रेल्वे स्टेशन वर थांबावे लागले. या काळात स्टेशन वर प्रचंड गर्दी होती. सौदी अरेबिया येथे जाणारे हाज यात्रेकरूंना सोडण्यासाठी आलेले प्रवाश्याची संख्याही यावेळी मोठी होती.
रात्री ९ :५० मिनिटांनी सिध्देश्वर एक्स्प्रेस पण प्लाॅटफाॅर्म क्रमांक १४ वर गाडी येत आहे असे अनाउन्समेंट झाले नंतर आम्ही प्लाॅटफाॅर्म क्रमांक १४ च्या दिशेने वाटचाल करत असताना साधारण ९:५८ वाजता एके छप्पन स्टेनगन मधुन गोळीबार सुरू झाला. फटाकड्याच्या आवाजासारखा आवाज माळ लावल्यासारखा सतत येत होता. परंतु आम्ही अतिरेकी च्या पाठमोरी असल्याने बाल बाल बचावलो या घटनेला आता अठरा वर्षे पूर्ण झाली आहेत .
आम्ही ज्या ठिकाणी बसलो होतो ते ठिकाण आम्ही काही क्षणापुर्वीच सोडले होते तर आमच्या शेजारी बसलेले सोलापूर चे प्रवासी, हज ला जाणारे व त्यांचे नातेवाईक या गोळीबारा मध्ये सापडले. दुर्दैवाने ते यात मुत्युमुखी पडल्याचे कळले. आजही हा प्रसंग आठवला की अंगावर शहारे येतात.
ज्या वेळी गोळीबार सुरू झाला, त्यावेळी पळत पळत जाऊन रेल्वे च्या डब्यात बसलो. सर्वत्र गोंधळ उडाला होता सगळे लोक सैरावैरा पळत होते. सर्वजण सुरक्षित जागा पकडायचा प्रयत्न करत होते. सगळ्यांना मोठ्या प्रमाणात भीती वाटत होती. दहशतीखाली वातावरण निर्माण झाले होते. प्रत्येक अज्ञात, अनोळखी व्यक्ती गणधारी वाटत होती. त्यावेळी त्या डब्यात अठरा प्रवासी होते. सोलापूर येथील महिला होत्या. त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या नातेवाईकांना फोन करून सुखरूप असल्याचे सांगितले. तर यावेळी करमाळ्यातुन अनेक मित्र परिवार नातेवाईकांचे फोन आले होते.

आजही २६/११ चा तो दिवस आला की ताज्या आठवणी जाग्या होतात. अजमल कसाब याची ती “स्टेनगन”ची आठवण आजही दहशत निर्माण करणारी थरकाप उडवणारी आहे. आम्ही या हल्ल्यात बाल बाल वाचलो असलो तरी त्याची भीती आजही वाटते. त्याने हाजी लोकांच्या शरीराची स्टेनगनने केलेली चाळण, देशवासीयांचे वाहिलेले खून हे कधीच माफ करण्याजोगे नाही. अशा दहशतवाद्यांना कसलीही जात नसते. अशांना यमसदनी पाठवणे हे आपले कर्तव्य ठरते.
…फारुक जमादार ,करमाळा जिल्हा सोलापूर

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!