कत्तलखान्याच्या प्रश्नावर अमळनेरात रणशिंग; विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचा जनआक्रोश आंदोलनाचा इशारा
अमळनेर : विक्की जाधव.
गोमातेच्या रक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, कत्तलखान्याच्या प्रश्नावर विश्व हिंदू परिषद बजरंग दल, अमळनेर आणि सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. कत्तलखाना उद्ध्वस्त करण्याच्या मागणीसाठी शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता तिरंगा चौक ते नगरपालिका, अमळनेर असा भव्य जनआक्रोश आंदोलनाचा मोर्चा काढण्यात येणार आहे.
गोमातेचे रक्षण आणि सन्मान यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने हिंदू बांधव व गोभक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. ‘एकच ध्यास, गोमातांचे सन्मान व रक्षण’ या घोषणेसह प्रशासनाचे लक्ष कत्तलखान्याच्या प्रश्नाकडे वेधण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, या आंदोलनासोबतच बेमुदत आमरण उपोषण करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. त्यामुळे २७ नोव्हेंबर रोजी अमळनेरात कत्तलखान्याच्या प्रश्नावर मोठा जनआक्रोश पाहायला मिळण्याची शक्यता आहे. प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित बाबींवर कायदेशीर चौकशी व आवश्यक कारवाई करावी, अशी भूमिका आयोजकांनी मांडली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली असून, आंदोलनाला किती मोठा प्रतिसाद मिळतो याकडे शहराचे लक्ष लागले आहे. अधिकाधिक हिंदू बांधव आणि गोभक्तांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि सकल हिंदू समाज, अमळनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे.