साने गुरुजी विद्यामंदिर अमळनेर इ.1 ली.च्या विद्यार्थ्यांना ओळखपत्रांचे वाटप.
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, साने गुरुजी विद्यामंदिर अमळनेर जि.जळगांव या नामांकित शाळेमध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक आदरणीय श्री .संजीव बन्सीलाल पाटील सर यांच्या हस्ते ओळख पत्रांचे वाटप करण्यात आले. ओळखपत्र वाटप करते वेळी इयत्ता पहिलीच्या पाचही तुकडीतील विद्यार्थ्यांना आदरणीय श्री संजीव पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना ओळखपत्र दररोज आणण्यासाठी आग्रह केला आणि ओळखपत्र का गरजेचा आहे याविषयी माहिती सांगितली यामध्ये त्यांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली ओळख आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे का आहे हे पटवून दिले.