कर्मयोगीची वारी बळीराजाच्या दारी..
दुष्काळग्रस्त सरोदे परिवाराला ११ हजार रुपयांची आर्थिक मदत
दिवाळीच्या दिवशी दुष्काळग्रस्त लोहारी सावंगा या गावाला मुख्यमंत्री महोदयांनी भेट दिली व हे गाव प्रकाशझोतात आले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्यांची परिस्थिती किती भीषण आहे हे संपूर्ण महाराष्ट्र राज्याला दाखवून दिले. तसेच महत्वपूर्ण म्हणजे येथील शेतकरी दिलीप सरोदे आपलं फाटलेल शर्ट दुपट्यांन झाकत मुख्यमंत्री महोदयाना त्यांचं दुष्काळाने करपलेलं शेत दाखवत होते, त्यांचा शर्ट नव्हे तर संपूर्ण परिवारच या दुष्काळाच्या तिव्रतेमुळे फटण्याच्या अवस्थेत आहे याची जाणीव मुख्यमंत्री महोदयांच्या या भेटीमुळे महाराष्ट्राला नव्हे तर सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण देशाला झाली.
हे सर्व वास्तव चित्र पाहिल्यावर दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोज रविवारला कर्मयोगी फाऊंडेशनची टीम बळीराजाची व्यथा जाणून घेऊया, त्याला मदतीची शिदोरी घेऊन जाऊया या अभियाना अंतर्गत लोहारी सावंगा येथे जाऊन दिलीप सरोदे यांची भेट घेतली. त्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली तेव्हां लक्षात आले की त्यांनी पाच एकरात ९० हजार रुपये लावले परंतु त्यातून त्याचा शेतीला लावलेला खर्चही निघणार नाही. या भागातील मोसंबीची झाडे सुद्धा पाण्याच्या अभावी सुकण्याच्या परिस्थितीत आहे. हे सर्व वास्तव चित्र पाहल्यावर या संकटातून उभारण्यासाठी त्यांना कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे ११ हजार रुपयांची मदत करण्यात आली. सोबतच त्यांना कपडे करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यात आले.
या हृदयस्पर्शी मदतीबद्दल बोलताना दिलीप सरोदे यांच्या पत्नी राधिका सरोदे भावना व्यक्त करताना म्हणाल्या की कर्मयोगी हे पहिली संस्था आहे ज्यांनी आमचं दुःख जाणून, आमच्या घरी येऊन आम्हाला आर्थिक सहकार्य केलं. जगावं कसं? मुलांचं शिक्षण करावं कसं? हे सर्व प्रश्न समोर असताना कर्मयोगीने आम्हाला या मदतीतून जगण्याची एक आशा दिली..
या उपक्रमा विषयी सांगताना कर्मयोगी फाऊंडेशचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे म्हणाले की
या उपक्रमापासून प्रेरणा घेत समाजसेवी संघटनांनी व मानवता जपणाऱ्या मंडळींनी समोर येऊन शेतकरी जगला पाहिजे यासाठी शक्य ती मदत करून त्यांना आधार देण्याचं सहकार्य करावं, अन्यथा कोरोना काळात ज्याप्रमाणे माणसं फटाफट मरत होती, त्याप्रमाणे येणाऱ्या दिवसात शेतकऱ्याच्या आत्महत्या पहायला मिळतील. म्हणूनचं कोणत्याही मुलांच्या वडिलांचे छत्र हिरावू नये, कोणत्याही आपल्या शेतकरी बहिणीवर कुंकू पुसण्याची वेळ येऊ नये, कोणत्याही म्हाताऱ्या आईवडिलांचा कर्ता मुलगा त्यांच्यासमोर जाऊ नये यासाठी जगाचा पोशिंदा शेतकरी जगला पाहिजे यासाठी आमची प्रामाणिक धडपड आहे*
यावेळी कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे, ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. प्रशांत कडू, शिवाजी बारेवार, नंदकिशोर मानकर, सरोदे परिवार, गावकरी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती..