अनधिकृत बॅनर्समुळे वाहतुकीला अडथळा! प्रशासन एखादी दुर्घटना घडण्याची वाट पाहताय का? अनधिकृत बॅनरवर कारवाई कधी?

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261111-WA0387

अनधिकृत बॅनर्समुळे वाहतुकीला अडथळा! प्रशासन एखादी दुर्घटना घडण्याची वाट पाहताय का? अनधिकृत बॅनरवर कारवाई कधी?

 

पारस गोल्ड आणि रवी ज्वेलर्सच्या बॅनरमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार; नगरपालिका प्रशासन आणि शहर वाहतूक पोलिसांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष!

 

 

अमळनेर : विक्की जाधव.

शहरातील मुख्य रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे तसेच विद्युत खांबांवर अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या मोठमोठ्या बॅनरमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढला आहे. शहरातील विविध भागांत अंदाजे ४०० ते ५०० बॅनर, जाहिरात फलक व होर्डिंग लावण्यात आल्याचा दावा तक्रारदार जितेंद्र संधानशिव यांनी याबाबत अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार निवेदन देण्यात आले आहे.

विशेष म्हणजे पारस गोल्ड आणि रवी ज्वेलर्स यांचे अनधिकृत बॅनर हे मुख्य रस्त्यालगत तसेच विद्युत खांब आणि चौकांच्या परिसरात उभारण्यात आल्याने वाहनचालकांचे लक्ष विचलित होण्याची शक्यता निर्माण होते. शहरात विविध ठिकाणी लागलेल्या पारस गोल्ड आणि रवी ज्वेलर्स च्या अनाधिकृत होर्डिंग,जाहिराती ह्या नागरिकांच्या जीवावर भेतल्या असून माऊली चहा गलवाडे रोड येथे एका व्यक्तीने गाडी ठोकून दिल्याचे देखील निदर्शनास आले आहे हा विषय सुरक्षिततेशी जोडला गेला असून रस्त्याच्या कडेला उभारलेले मोठे बॅनर वाहनचालकांच्या दृष्टीआड येत असून, वाऱ्यामुळे बॅनर किंवा त्यांचे लोखंडी सांगाडे कोसळल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात येत आहे. सार्वजनिक रस्ते आणि विद्युत खांबांचा अशा पद्धतीने अनधिकृत वापर करणे हा सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर विषय असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

विशेषतः पारस गोल्ड आणि रवी ज्वेलर्ससह विविध जाहिरातींचे बॅनर रस्त्यालगत लावण्यात आल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले असून, संबंधित बॅनरना परवानगी आहे की नाही, याची प्रशासनाने तपासणी करून कारवाई करावी. अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच असे वाहतुकीस अडथळा ठरणारे बॅनर तातडीने हटवावेत, अशी मागणी केली आहे. याशिवाय या प्रकरणाची दखल घेऊन गुन्हा नोंदविण्याची आणि करण्यात आलेल्या कारवाईची माहिती तक्रारदारास लेखी स्वरूपात देण्याची मागणीही करण्यात आली आहे. नगरपरिषद प्रशासन आणि शहर वाहतूक पोलीस विभागाने केवळ तक्रार येण्याची वाट न पाहता शहरातील अनधिकृत बॅनरची मोहीम राबवून रस्ते मोकळे करावेत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. संभाव्य अपघात घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा त्यापूर्वीच प्रतिबंधात्मक पावले उचलणे गरजेचे असून, अमळनेरच्या वाहतुकीला शिस्त आणि नागरिकांना सुरक्षित रस्ते मिळणार का, याकडे आता प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!