दुष्काळजन्य स्थितीतही दिवाळीत गोडवा मंगळग्रह सेवा संस्थेचा उपक्रम : आमोदे येथे फराळ वाटप
अमळनेर : विक्की जाधव.
एकीकडे दुष्काळजन्य स्थिती, तर दुसरीकडे दिवाळीचा महत्त्वपूर्ण सण… अशा स्थितीत गरजवंतांच्या घरातही आनंदाचा दीप उजळावा आणि त्यांच्या दिवाळीत गोडवा निर्माण व्हावा, या सामाजिक बांधिलकीतून मंगळग्रह सेवा संस्थेने ‘माणुसकीची दिवाळी’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. संस्थेतर्फे तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन गरजवंतांना दिवाळी फराळाचे वाटप केले जात आहे. या उपक्रमांतर्गत शनिवार, दि. 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी आमोदे येथे जवळपास 45 गरजू कुटुंबांना फराळाची पाकिटे वितरीत करण्यात आली.

यावेळी आमोदेचे उपसरपंच शुभम राजेंद्र पाटील, माजी सरपंच नामदेव अभिमन पाटील, राजेंद्र पंडित पारधी, राजेंद्र गुलाब पाटील, प्रताप पंडित पारधी, अमृत काशीराम पाटील, भिवराज गोबा पाटील.

तसेच मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, मंगल सेवेकरी भानुदास पाटील यांच्यासह गावातील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमासाठी स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी सहकार्य केले.