श्री मंगळग्रह मंदिरात विधिवतरित्या भक्तिमय वातावरणात लक्ष्मीपूजन आणि मानकऱ्यांच्या शुभहस्ते श्री लक्ष्मीमाता, श्री भूमीमातेसह श्रीयंत्रावर अभिषेक

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261108-WA1349

श्री मंगळग्रह मंदिरात विधिवतरित्या भक्तिमय वातावरणात लक्ष्मीपूजन आणि मानकऱ्यांच्या शुभहस्ते श्री लक्ष्मीमाता, श्री भूमीमातेसह श्रीयंत्रावर अभिषेक

 

अमळनेर : विक्की जाधव.

येथील ख्यातकीर्त श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार, दि. 8 नोव्हेंबर रोजी नरकचतुर्दशी व लक्ष्मी पूजनानिमित्ताने श्री लक्ष्मीमातेचे प्रतीक असलेले श्रीयंत्र, श्री भूमीमाता, श्री लक्ष्मीमातेच्या उत्सवमूर्तींवर विधिवतरित्या अभिषेक करून लक्ष्मीपूजन मोठ्या भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाले.

IMG-20261108-WA0692

या परम पवित्र पूजेचे विशेष मानकरी संजय जगन्नाथ मुसळे (संचालक, महालक्ष्मी लॅबरोटरी) व त्यांच्या धर्मपत्नी सौ. अर्चनाताई मुसळे, इंजि. रोहित रमेश वाणी (पुणे) व त्यांच्या धर्मपत्नी  सौ. प्रणालीताई वाणी, उमाकांत अशोकराव हिरे (उपशिक्षक, जी. एस. हायस्कूल) व त्यांच्या धर्मपत्नी सौ. जागृतीताई हिरे (शिक्षिका, शांतिनिकेतन प्राथमिक विद्यामंदिर) तसेच राहुल दिलीप बहिरम (पत्रकार, शिक्षक, जी. एस. हायस्कूल) व त्यांच्या धर्मपत्नी सौ. सुवर्णाताई बहिरम (शिक्षिका, भगिनी मंडळ) होते.  या सर्व मानकऱ्यांच्या शुभ हस्ते गणपती पूजन, लक्ष्मीमातेचे पूजन, धन पूजन, वही खात्याचे पूजन करून लक्ष्मीमाता, भूमिमाता तसेच श्रीयंत्रावर अभिषेक करण्यात आला. आनंदोत्सवांतर्गत सर्व उत्सवमूर्तींचे पूजन झाले. त्यानंतर महाआरतीने या धार्मिक सोहळ्याची सांगता झाली. मंदिराचे पुरोहित शुभम वैष्णव गुरुजी, अक्षय जोशी गुरुजी, हेमंत गोसावी गुरुजी यांनी पौरोहित्य केले. त्यांना चेतन नाईक यांनी सहकार्य केले. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, मंगल सेवेकेरी विनोद कदम, प्रकाश मेखा आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!