न्यायालयीन कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर संप यशस्वी करण्याचा महासंघाचा निर्धार 

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261116-WA0706

न्यायालयीन कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर संप यशस्वी करण्याचा महासंघाचा निर्धार 

 

अमळनेर :  विक्की जाधव.

समान काम – समान वेतन या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व न्यायालयीन कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत. या संपात सहभागी होऊन संप यशस्वी करण्याचा निर्धार अमळनेर येथील न्यायालयीन कर्मचा-यांनी केला आहे.

उच्च न्यायालयीन कर्मचारी व राज्यातील दुय्यम न्यायालयातील कर्मचारी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तसेच दुय्यम न्यायालयातील कर्मचारी हे अधिक काम करीत असतात. असे असतांनाही दोघांच्या वेतनात खुप तफावत आहे. उच्च न्यायालयातील कर्मचा-यांना सन २००६ पासून जी वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे तीच वेतनश्रेणी महाराष्ट्रातील सर्व न्यायालयातील कर्मचा-यांना लागू करावी. समान कामाचे समान वेतन मिळावे ही कर्मचारी महासंघाची खुप वर्षांपासूनची मागणी आहे. न्यायालयीन कर्मचारी महासंघ गट क,महाराष्ट्र ज्युडिशियल स्टेनोग्राफर असोसिएशन,महाराष्ट्र राज्य न्यायालयीन बेलीफ कर्मचारी महासंघ,न्यायालयीन गट ड कर्मचारी महासंघ या संघटनांनी शासनाकडे वेळोवेळी संघटनेने पाठपुरावा केलेला आहे.तरी देखील शासन मागणी मंजूर करण्यात टाळाटाळ करीत असल्याची भावना कर्मचारी वर्गात निर्माण झाली आहे.

या विषयात मुंबई उच्च न्यायालयाने कर्मचा-यांच्या सुधारित वेतनश्रेणीचा प्रस्ताव दि.३१ जानेवारी २०२५ रोजी शासनाकडे सादर केला आहे. त्यावर आजतागायत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या मागणीसाठी कर्मचा-यांनी दि.१६ व १७ सप्टेंबर रोजी काळ्या फिती लावून आंदोलन देखील केले होते. तरी देखील शासन दखल घेत नसल्याने उद्यापासून कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत.

अमळनेर येथे न्यायालयीन कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-यांनी आज न्यायालय प्रवेशद्वाराजवळ एकत्र येत बेमुदत संपात सहभागी होण्याचा निर्धार केला आहे. सेवानिवृत्त कर्मचारी महासंघाने या मागणीस पाठिंबा जाहीर केला आहे. उद्या जळगाव येथे सेवानिवृत्त कर्मचारी एकदिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!