करमाळाकरांनो पाणी जपून वापरा! १९ ते २४ नोव्हेंबर दरम्यान शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG_1151

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड): करमाळा शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी दहिगाव पंपिंग स्टेशन येथे नवीन पंप बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या तांत्रिक कामामुळे दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ ते २४ नोव्हेंबर २०२६ या सहा दिवसांच्या कालावधीत करमाळा शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती करमाळा नगरपरिषदेने एका जाहीर सूचनेद्वारे दिली आहे.

दहिगाव पंपिंग स्टेशनवरील नवीन पंप बसविण्याचे काम महत्त्वाचे असल्याने या कालावधीत पाणी उपसा पूर्णतः बंद ठेवला जाणार आहे. परिणामी, संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा खंडित राहील. नागरिकांना या काळात पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी सर्व करमाळाकरांनी याची आगाऊ नोंद घेऊन आपल्या गरजेनुसार पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा.

तसेच, या सहा दिवसांच्या काळात उपलब्ध असलेले पाणी अत्यंत जपून व काटकसरीने वापरावे आणि या महत्त्वाच्या कामासाठी नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करमाळा नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!