पानखिडकी परिसरात झालेल्या मारामारीच्या गुन्ह्यात जय बजरंग मित्र मंडळाचां कोणताही संबंध नाही..
अमळनेर : विक्की जाधव.
पानखिडकी परिसरात झालेल्या मारामारीच्या गुन्ह्यात जय बजरंग मित्र मंडळाच्या नावाचा विनाकारण उल्लेख करून हरीश भावसार याने त्यांच्याविरुद्ध झालेल्या गुन्ह्याला काटशह देण्यासाठी खोटा गुन्हा दाखल केल्याचे निवेदन जयबजरंग मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम याना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की , हरीश भावसार याचा जयबजरंग गणेश मंडळाच्या आर्थिक हिशोबाशी काहीही संबंध नाही. त्याच्यावर झालेल्या गुन्ह्यामुळे व सौरभशी असलेल्या वादातून त्याने पोलिसांची दिशाभूल केली आहे. व खोटी माहिती देऊन जय बजरंग मंडळ आणि गणेशोत्सव बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आमच्या सामाजिक व धार्मिक मंडळाची समाजात बदनामी झाली आहे. आमच्या मंडळाच्या हिशोबाचा काहीही वाद नाही. त्यामुळे त्यांच्या भांडणात तपासात मंडळ अथवा मंडळाचे कार्यकर्ते याना त्रास व्हायला नको व हरीश भावसार आणि साक्षीदार यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक गोपी कासार ,जितेंद्र पवार , कमलेश गुरव ,निखिल चौधरी , गणेश चौधरी ,मुकेश पाटील ,श्रीकांत करंजे , दिनेश सैंदाणे , हर्षल विसपुते , राज गोलेच्छा ,चेतन चौधरी , मनोज पाटील , अमोल चौधरी , हर्षल भावसार ,रितेश चौधरी ,गणेश जाधव ,परेश भामरे , रवींद्र बारी ,ऋषीकेश बारी , महेश करंजे ,प्रसाद करंजे ,प्रशांत चौधरी ,वैभव खैरनार यांच्यासह ६१ मंडळाच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.