महापालिका सचिव जवादवार यांची बनवेगिरी : भदाणेला वाचविण्याचा प्रयत्न

अपनी भाषा में पढ़े! Translate

903788651_1713625843664816_3685728682605712478_n

महापालिका सचिव जवादवार यांची बनवेगिरी : भदाणेला वाचविण्याचा प्रयत्न
उल्हासनगर महापालिकेचे सचिव अनंत ज
जवदवार हे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. वृक्ष समिती बाबत त्यांनी अपूर्ण माहिती देऊन बेकायदेशीर वृक्ष समितीस संरक्षण दिले.
त्यांनी माहितीच्या अधिकाराची ऐसी तैसी करून टाकली.
*असाच प्रकार काल प्रसारित करण्यात आलेल्या महासभेचा विषय पत्रिकेच्या नोटीस मध्ये केला आहे. युवराज धोंडू भदाणे यास रीतसर व सखोल चौकशी अंती व त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी दिली देऊन तत्कालीन आयुक्तांनी त्यास बडतर्फ केले. तसेच विविध कलमांखाली मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या बडतर्फीस युवराज भदाणे याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते व ते प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.* न्याललायचा निकाल आपल्या बाजूने लागेल याची त्याला खात्री नसल्याने राजेंद्रसिंह भुल्लर या नगरसेवकांच्या माध्यमातून महासभेत प्रस्ताव आणून, त्याची बडतर्फी रद्द करून पुन्रस्थापित करण्याचा प्रस्ताव 20 नोव्हेंबर रोजीच्या आगामी महासभेत विषय क्र. 13 वर ठेवला आहे. *सचिव दर्ज्याच्या अधिकाऱ्याने न्यायप्रविष्ठ प्रकरण महासभेत ठेवणे गरजेचे नव्हते. त्यामुळे महासभा ही न्यायालयापेक्ष मोठी आहे असा अर्थ निघतो*.
याशिवाय नगरसेवक भुल्लर यांनी जो दोन पानी प्रस्ताव दिला आहे त्यातील पान नंबर दोन या सूचनेत दिलेले नाही, याचा अर्थ विरोधकांना गाफिल ठेवून हा प्रस्ताव मंजूर करून घेण्याचा महापालिका सचिवांचा हेतू असावा. तसेच युवराज भदाणे यांच्या ज्येष्ठ विधिज्ञाने दिलेले कायदेशीर मत सुद्धा दडवण्यात आले आहे. या मागे विरोधकांना अंधारात ठेवण्याचा हेतू असावा.ऍड. अर्शद शेख हे भदाणेच्या वतीने महापालिकेविरोधात दावा लढवत आहेत. त्यांचे मत हा काही अंतिम निकाल नाही किंवा महापालिकेस बंधनकारक नाही. प्रत्येक वकील हा आपल्या आशिलाची बाजू मांडण्यासाठी कायद्याचा आधार घेत असतो. हा दावा न्यायालयात महापालिकेचे ज्येष्ठ विधिज्ञ् खोडून काढू शकतात. नगरसेवकांना त्याचे ज्ञान असतेच असे नाही.
युवराज भदाणे याने महापालिके विरोधात दावे दाखल करून महापालीकेच्या बडतर्फी व FIR आव्हान दिले आहे. सादर प्रकरण न्याय प्रविष्ठ असताना नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर व सचिव जावडवर यांनी सदर प्रस्ताव महासभेत आणणे अनुचित असून पुढे मागे contempt of court होऊ शकते.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
9822902470

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!