भल्या पहाटे कत्तलखान्यात पोलिसांची एंट्री अन् परिसरात एकच खळबळ! मांस, कातडी अन् सात आरोपीसह २८ हत्यारे जप्त

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261117-WA1150

भल्या पहाटे कत्तलखान्यात पोलिसांची एंट्री अन् परिसरात एकच खळबळ! मांस, कातडी अन् सात आरोपीसह २८ हत्यारे जप्त.

 

अमळनेर : विक्की जाधव.

ऑपरेशन ऑल आऊट मोहिमेत अमळनेर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास पारधीवाडा येथील कत्तलखान्यावर धाड टाकत मोठी कारवाई केली. पोलिसांच्या या अचानक छाप्यामुळे कत्तलखान्यात एकच खळबळ उडाली. कारवाईदरम्यान तब्बल ५७० किलो विविध जनावरांचे मांस, सुमारे ५० किलो कातडी, हाडे, शिंगे तसेच कुऱ्हाडी, सुऱ्या व कोयत्यांसह साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध पशुसंरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार ऑपरेशन ऑल आऊट मोहीम सुरू असताना पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना कत्तलखान्यात जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजता उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांच्यासह पोलिस पथकाने पारधीवाडा मुस्लिम कब्रस्थान परिसरातील कत्तलखान्यावर छापा टाकला. पोलिसांचे पथक पोहोचताच इकबाल कुरेशी व बाबा कुरेशी यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी परिसराला घेराव घालून इतर संशयितांना ताब्यात घेतले.

कारवाईत १८ हजार रुपये किमतीचे ३०० किलो गोवंश जातीचे मांस, ६ हजार रुपये किमतीचे १०० किलो म्हशीचे मांस, तसेच अन्य १७० किलो मांस, कातडी, हाडे, शिंगे आणि २८ कुऱ्हाडी, सुऱ्या व कोयते असा एकूण ४४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. जप्त केलेले मांस, हाडे, कातडी व शिंगे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने मोठा खड्डा करून पुरून नष्ट करण्यात आले. या प्रकरणी शेख रमजान शेख मुख्तार, अब्दुल अजीज अब्दुल शकुर, अल्ताफ खा अजीज खा पठाण, सलमान रजा सलीम अहमदखान, शेख मुख्तार शेख बिस्मिल्ला, इकबाल कुरेशी आणि बाबा कुरेशी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ मधील कलम ५, ५(अ), ५(ब), ५(क), ९, ९(अ), प्राणी छळ प्रतिबंधक कायदा १९६० मधील कलम ११ तसेच भारतीय न्यायसंहिता कलम ३२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे बेकायदेशीर कत्तलीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने उचललेल्या पावलांची जोरदार चर्चा सुरू झाली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!