ST वाहकानें रात्रीच्या अंधारात दोन मुलींना रस्त्यावर सोडले; बातमीची दखल घेत चालक-वाहकांवर कारवाई

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261117-WA1162

ST वाहकानें रात्रीच्या अंधारात दोन मुलींना रस्त्यावर सोडले; बातमीची दखल घेत चालक-वाहकांवर कारवाई

 

मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव.

एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना रात्रीच्या वेळी रोहा येथे अंधारात बसमधून उतरविल्याची धक्कादायक घटना माध्यमांतून समोर येताच परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत त्यांनी संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

दि. १४ नोव्हेंबर रोजी भंडारा आगाराच्या एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना रात्रीच्या वेळी रोहा येथे अंधारात बसमधून उतरविण्यात आल्याची बातमी स्थानिक वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या तसेच समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाली होती. या घटनेमुळे प्रवाशांच्या, विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले. घटनेची दखल घेत एसटी प्रशासनाने प्राथमिक चौकशी केली आणि संबंधित चालक अनिल सावरे व वाहक उदेभान मैश्राम यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. या कारवाईनुसार दोन्ही कर्मचाऱ्यांना दि. १६ नोव्हेंबर २०२६ पासून एसटी सेवेतून निलंबित करण्यात आले असून, एसटीच्या शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार त्यांच्याविरुद्ध पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. यापुढे अशा प्रकारची घटना घडू नये आणि शाळकरी विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळील नियोजित थांब्या पर्यंत सुरक्षित पोहोचविण्याची जबाबदारी एसटी कर्मचाऱ्यांनी पार पाडावी, अशा स्पष्ट सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!