जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जयश्रीताई पाटील यांचा बिनविरोध विजय; अनिलदादांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वासाचा शिक्का..

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261117-WA1153

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जयश्रीताई पाटील यांचा बिनविरोध विजय; अनिलदादांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वासाचा शिक्का..

 

अमळनेर : विक्की जाधव.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी मंत्री तथा आमदार अनिलदादा पाटील यांच्या सक्षम आणि प्रभावी नेतृत्वाखाली माजी नगराध्यक्षा सौ. जयश्रीताई अनिलजी पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! त्यांच्या या विजयामुळे सहकार क्षेत्रातील नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वासाची मोहोर उमटली असून, कार्यक्षम नेतृत्वाला मिळालेला हा सन्मान असल्याची भावना व्यक्त होत आहे.

आमदार अनिलदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला हा बिनविरोध विजय म्हणजे संघटनशक्ती, सहकार आणि विश्वासाचे प्रतीक मानला जात आहे. जयश्रीताई पाटील यांच्या पुढील सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रातील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या नेतृत्वातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य सभासद, शेतकरी आणि सहकार क्षेत्राला अधिक बळ मिळो, अश्या सदिच्छा अनेकांनी व्यक्त केल्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!