दहिवद येथे धरतीआबा भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर,

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261118-WA0173

दहिवद येथे धरतीआबा भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर,

 

अमळनेर : विक्की जाधव.

धरतीआबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात साजऱ्या होत असलेल्या ‘जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहा निमित्त लोक संघर्ष मोर्चा च्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आदिवासी विकास विभागातर्फे, दहिवद (ता. अमळनेर) येथे मोफत आरोग्य तपासणी व पोषण जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील नागरिक व आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला,

दरम्यान आज दिनांक 18 नोव्हेंबर 2026 रोजी आयोजित आरोग्य शिबिरात रक्तदाब, मधुमेह व इतर तपासणी करण्यात आली. शिबिरामध्ये एकूण 52 लाभार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सदर शिबिरात लोक संघर्ष मोर्चा व आदिवासी पारधी विकास परिषदेचे नेते श्री. पन्नालाल मावळे मा. उपसरपंच श्री. प्रवीण आंबा माळी, सामाजिक कार्यकर्ते गणेश माळी (बाळाभाऊ) यावल प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी श्री खंबायत साहेब,शासकीय आश्रम शाळा दहिवद मुख्याध्यापक श्री शिरसाठ सर व अधीक्षक चव्हाण सर, वैद्यकीय अधिकारी कदम मॅडम, दहीवद आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्री घनश्याम पाटील सर, दहिवद आश्रमशाळा येथील ANM पवार मॅडम, दहिवद ग्रामपंचायतीचे प्रशासक श्री. सुरेश कठाळे, ग्रामसेवक श्री शेखर धनगर, अनुदानित आदिवासी आश्रम शाळा ताडेपुरा अमळनेर येथील प्राथमिक मुख्याध्यापक श्री रजनीकांत भामरे सर, कनिष्ठ लिपिक जाकीर शेख, आरोग्य केंद्रातील सर्व नर्स व आशा सेविका व गावातील आदिवासी कार्यकर्ते समाधान पारधी, मुकेश पारधी, तेजस पारधी, फोटोग्राफर भागवत पारधी, अजय पारधी, सुनिल चव्हाण, नरेश पारधी, दिनेश साळुंके, अनिल चव्हाण, मिथुन चव्हाण, मनोज पारधी, सागर पारधी, प्रमोद पारधी, सहकारी यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!