वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉ. सुभाष हरिभाऊ महाजन यांचे निधन

अपनी भाषा में पढ़े! Translate

802f0752-5f5d-43bb-9bfa-deeb84d70cec

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- करमाळा येथील वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉ. सुभाष हरिभाऊ महाजन (वय ७९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
भोर (जिल्हा पुणे) येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित महाजन व करमाळा येथील दंतचिकित्सक डॉ. संदीप महाजन यांचे ते वडील, तर उपजिल्हा रुग्णालयाच्या सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. सरोजिनी खोत-महाजन यांचे ते पती होत. त्यांनी त्यांच्या दोन्ही सुपुत्रांना वैद्यकीय शिक्षण देऊन घडवले.
त्यांचे पुत्र डॉ. संदीप महाजन हे करमाळा येथे गेल्या १५ वर्षांपासून, जेऊर येथे १० वर्षांपासून, तर पुणे येथे ६ वर्षांपासून स्वतंत्र दंतवैद्यकीय प्रॅक्टिस करत आहेत. पुणे येथील दंतचिकित्सालयाची जबाबदारी त्यांच्या पत्नी डॉ. अश्विनी संदीप महाजन या गेल्या ६ वर्षांपासून स्वतंत्रपणे सांभाळत आहेत. तर डॉ अभिजित महाजन हे पुणे जिल्ह्यातील भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी रेणुका ही तेथे डॉ. म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. सुभाष महाजन यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी सर्व स्तरांतील नागरिक उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!