मांडळ येथील वाळू वाहतूकीचे ट्रॅक्टर पळून नेणाऱ्या वर अखेर गुन्हा दाखल 

अपनी भाषा में पढ़े! Translate

मांडळ येथील वाळू वाहतूकीचे ट्रॅक्टर पळून नेणाऱ्या वर अखेर गुन्हा दाखल 

 

अमळनेर: विक्की जाधव.

तालुक्यातील मांडळ येथे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांना दमदाटी करून ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून मांडळ येथील पुंडलिक सुभाष कोळी आणि सतीश यशवंत कोळी या दोघांविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांडळ येथील ग्राम महसूल अधिकारी संदीप बन्सीलाल माळी यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास हेडकॉन्स्टेबल मुकेश साळुंखे करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मांडळ येथील ग्राम महसूल अधिकारी संदीप माळी आणि बाम्हणे येथील ग्राम महसूल अधिकारी विकेश अशोक भोई यांना १४ तारखेला सकाळी ७.१० वाजता मांडळ परिसरात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कारवाईसाठी जात असताना मांडळहून जवखेडा दिशेने सुमारे दीड ब्रास वाळूने भरलेले ट्रॅक्टर जाताना त्यांना दिसले. अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टरचा पाठलाग करून चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला असता, परवाना नसल्याचे त्याने सांगितले. ट्रॅक्टर महसूल कार्यालयात जमा करण्यास सांगितल्यावर “ट्रॅक्टर जमा करणार नाही, तुमच्याकडून जे होईल ते करा,” असे म्हणत त्याने दमदाटी केली. चालक व मालकाचे नाव विचारले असता त्याने पुंडलिक सुभाष कोळी असे सांगितले.

दरम्यान, ट्रॅक्टरने अधिकाऱ्यांच्या मोटारसायकलला कट मारून चालकाने ट्रॅक्टर पळवून नेल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांनी पाठलाग सुरू ठेवला असता, जवखेडा येथे जात असताना ट्रॅक्टरचे चाक गटारीत अडकल्याने ट्रॉली पलटी झाली. त्याचवेळी पुंडलिक कोळी याचा मित्र सतीश यशवंत कोळी तेथे आला. दोघांनीही अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असून, ट्रॉली घटनास्थळी सोडून ट्रॅक्टरचे धूड घेऊन दोघेही पळून गेले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!