सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचा अवमान केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक; तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261122-WA0928

सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचा अवमान केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक; तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी

 

अमळनेर : विक्की जाधव.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राचा अवमान केल्याच्या आरोपावरून अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना (शिंदे गट) नेते संजय निरुपम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली. आंदोलनाच्या प्रारंभी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भागवत सूर्यवंशी, शांताराम पाटील, सुलोचना वाघ, मनोज पाटील, भागवत गुरुजी आणि ॲड. रज्जाक शेख यांनी संबंधित विषयावर आपली भूमिका मांडली. सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राचा अवमान केल्याचा आरोप करत वक्त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ (Belonging: A Journey of Love) या आत्मचरित्रावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पुस्तकाची पाने तसेच पोस्टर्स फाडून संजय निरुपम यांनी सोनिया गांधी यांचा अवमान केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सदर आत्मचरित्रावर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली आहे. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असताना अमळनेरमध्येही काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला.

तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी “सोनिया गांधी यांचा अपमान सहन केला जाणार नाही” आणि “संजय निरुपम यांचा धिक्कार असो” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यानंतर संजय निरुपम यांच्या प्रतिमेचे दहन करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी महेश पाटील, गजेंद्र साळुंखे, लोटन चौधरी, प्रताप पाटील, के. व्ही. पाटील, भिकाजी पाटील, अधिकार पाटील, रोहिदास कापडे, शिंदे, कन्हैयालाल कापडे, सुधाकर भैसे, दिलीप पाटील, प्रकाश सोनवणे, ताराचंद सूर्यवंशी, आर. जे. पाटील यांच्यासह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राच्या अवमानाचा निषेध करत अमळनेर काँग्रेसने या आंदोलनातून आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!