शिवसेना संपर्क कार्यालय आणि बाजार ओट्याच्या बांधकामाचे आज मा.नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन..

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261121-WA1022

 

शिवसेना संपर्क कार्यालय आणि बाजार ओट्याच्या बांधकामाचे आज मा.नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन..

 

अमळनेर : विक्की जाधव.

शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या आणि नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात येणाऱ्या बाजार ओट्याच्या बांधकामाचे भूमिपूजन तसेच अमळनेर विधानसभा शिवसेना संपर्क कार्यालयाचे लोकार्पण २१ रोजी दुपारी ४ वाजता राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

माजी आमदार शिरिषदादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ परीक्षित बाविस्कर यांच्यासह नगरसेवकांच्या प्रयत्नाने अमळनेर नगरपरिषद हद्दीतील फायनल प्लॉट क्रमांक १२३ मध्ये नागरिकांच्या सोयीसाठी शहराच्या विकासात भर घालणारे आठवडे बाजाराचे ओटे बांधण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे जनतेच्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते मा.ना.एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवांश बिझनेस हब, धुळे रोड येथे शिवसेना संपर्क कार्यालय सुरू करण्यात येत आहे. त्याचेही लोकार्पण दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार अमोल पाटील , आमदार चंद्रकांत सोनवणे , आमदार किशोर पाटील , आमदार चंद्रकांत पाटील , शिवसेना उपनेत्या सरिता माळी(कोल्हे), शिवसेना जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील , पारोळा लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह स्थानिक सभापती , गटनेते , नगरसेवक ,मुख्याधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व आजी माजी नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, चेअरमन, पदाधिकारी, शाखा प्रमुख, बुथ प्रमुख, व्यापारी वर्ग या कार्यक्रमास फायनल प्लॉट १२३ मध्ये व शिवांश बिझनेस हब, धुळे रोड येथे उपस्थित रहावे असे आवाहन माजी आमदार शिरीष चौधरी व लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ परीक्षित बाविस्कर यांनी केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!