पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहाच्या व खेळीमेळीच्या आनंदाच्या वातावरणात संपन्न 

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261121-WA1061

पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहाच्या व खेळीमेळीच्या आनंदाच्या वातावरणात संपन्न..

 

अमळनेर : विक्की जाधव.

पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये हिवाळी वार्षिक क्रीडा स्पर्धा या आनंदमय खेळीमेळीच्या व उत्कंठावर्धक वातावरणात संपन्न झाल्या. तीन दिवसीय कालखंडात उपरोक्त स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या अंतर्गत सुप्त गुणांना वाव देण्याचा एक स्पर्धा म्हणून नव्हे तर अनेक विद्यार्थ्यांना चतुरस्त्र बनवण्याचे कार्य ही स्पर्धा करीत असते. विद्यार्थ्यांना खेळा प्रती आवड व आकर्षण या स्पर्धेच्या माध्यमातून तर होते. त्यांना सुदृढ व काटक सशक्त प्रबलता प्रदान करण्याचे कार्य या स्पर्धेच्या अनुषंगाने या विद्यार्थ्यांना गोष्टी अनुभवता येत असतात. सकाळ व दुपारच्या अशा दोन वेगवेगळ्या क्षेत्रात या स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक जे.एस. देवरे पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक महेश माळी पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी यांच्या शुभहस्ते माता सरस्वती व हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आले.या स्पर्धेमध्ये 100 मीटर, 200 मीटर,400 मीटर धावणे, डॉस बॉल कबड्डी, क्रिकेट, स्लोसायकलिंग,बुक बॅलन्सिंग, गोळा फेक अशा अनेक नानाविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये हाऊस वाइस संघ सहभागी झाले. त्यामध्ये ग्रीन हाऊस, येलो हाऊस, रेड हाऊस, ब्लू हाऊस असे चमकदार, चुणूकदार व कौशल्य प्राप्त संघ होते व उपरोक्त क्रीडा मार्गदर्शन, संयोजन, संकल्पना व पंच रेफरी म्हणून क्रीडा शिक्षक महेश माळी, विनायक सूर्यवंशी रोहन मुंदडा, प्रशांत वंजारी यांनी आपले कार्य पार पाडले.

सदर स्पर्धेसाठी अनमोल मार्गदर्शन सहकार्य शाळेचे चेअरमन श्री संदेश गुजराथी, मुख्याध्यापक जे.एस.देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, व्ही.पी.बडवे, प्रशांत वंजारी व्हि.एस. अमृतकर, निलेश चौधरी, अशोक महाजन लक्ष्मण पाटील समस्त शिक्षक वृंदवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी वृंदवर्ग यांचे लाभले.

धन्यवाद!

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!