जिंती हद्दीत करमाळा पोलिसांची धडक कारवाई; देशी-हातभट्टी दारूसह गुटखा आणि अवैध पेट्रोल साठा जप्त, ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG_1274

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):- करमाळा तालुक्यातील जिंती गावच्या हद्दीत सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांवर करमाळा पोलिसांनी एकाच वेळी धडक कारवाई करत मोठा दणका दिला आहे. या संयुक्त छाप्यात पोलिसांनी अवैध देशी दारू, गावठी हातभट्टीची दारू, प्रतिबंधित विमल गुटखा आणि धोकादायकरीत्या साठवून ठेवलेला अवैध पेट्रोलचा साठा जप्त केला आहे. या संपूर्ण कारवाईत एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, मायलेकीविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

जिंती परिसरात छुप्या पद्धतीने देशी व हातभट्टीच्या दारूची विक्री होत असल्याची, तसेच शासनाने बंदी घातलेला विमल गुटखा आणि बेकायदेशीर पेट्रोल साठा करून विक्री सुरू असल्याची विश्वसनीय माहिती करमाळा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग अर्किले, प्रसाद अनभुले आणि एका महिला पोलीस कॉन्स्टेबल यांच्या पथकाने नियोजनपूर्वक सापळा रचून जिंती हद्दीत अचानक छापा टाकला.

छाप्यादरम्यान घटनास्थळावरून देशी दारूच्या बाटल्या, गावठी हातभट्टीची दारू, विमल गुटख्याची पाकिटे आणि प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये भरून ठेवलेला अवैध पेट्रोलचा साठा पोलिसांच्या हाती लागला. कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था न बाळगता अशा रीतीने पेट्रोलचा साठा करणे नागरिकांच्या जीवितास अत्यंत धोकादायक ठरू शकते; त्यामुळे पोलिसांनी तत्परतेने हा सर्व साठा ताब्यात घेतला.

या धडक कारवाईत देशी-हातभट्टी दारू, प्रतिबंधित गुटखा आणि पेट्रोल असा मिळून एकूण ६०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अलका पांढरे आणि तिची मुलगी सोनाली मार्कड (दोघी रा. जिंती, ता. करमाळा) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा, अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत गुटखा बंदीचे उल्लंघन तसेच अत्यावश्यक वस्तू कायद्यानुसार अवैध पेट्रोल साठ्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांच्या या कडक व आक्रमक भूमिकेमुळे जिंतीसह संपूर्ण करमाळा तालुक्यातील अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या घटनेचा पुढील तपास करमाळा पोलीस करत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!