शहराच्या विकासात आणखी एक मानाचा टप्पा! अद्ययावत बाजार ओटा व शिवसेना संपर्क कार्यालयाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न!
अमळनेर : विक्की जाधव.
शहराच्या विकासाला नवी दिशा देण्याच्या दृष्टीने अमळनेर नगरपरिषद हद्दीतील फायनल प्लॉट क्रमांक १२३, आठवडे बाजार येथे उभारण्यात आलेल्या अद्ययावत बाजार ओटा तसेच शिवसेना संपर्क कार्यालयाचा लोकार्पण व विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा शनिवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबरावजी पाटील साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या विकासकामांमुळे अमळनेर शहरातील व्यापारी बांधवांना तसेच नागरिकांना मोठा फायदा होणार असून, शहराच्या विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले शिवसेनेचे नंदुरबार लोकसभा संपर्कप्रमुख मा श्री शिरीष दादा चौधरी व लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.परिक्षित श्रीराम बाविस्कर यांच्या पुढाकारातून हा विकासाचा महत्त्वपूर्ण टप्पा साकार होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थिती सन्माननीय नगरसेवक नगरसेविका शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.