वाडिया हॉस्पिटलने माफ केले १ लाख ७ हजारांचे बिल; मनसे शाखाध्यक्षांकडून अंत्यसंस्कारासाठी आर्थिक मदत

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-11-24 at 4.18.46 PM

वाडिया हॉस्पिटलने माफ केले १ लाख ७ हजारांचे बिल; मनसे शाखाध्यक्षांकडून अंत्यसंस्कारासाठी आर्थिक मदत

WhatsApp Image 2026-11-24 at 4.28.16 PM
WhatsApp Image 2026-11-24 at 4.28.16 PM

मुंबई : अवघ्या १२ दिवसांच्या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर आर्थिक अडचणीत सापडलेल्या गरीब कुटुंबाला मनसे शाखाध्यक्ष सचिन प्रकाश शिंदे यांनी मदतीचा हात दिला. त्यांच्या पाठपुराव्यानंतर वाडिया हॉस्पिटल व्यवस्थापनाने कुटुंबाचे तब्बल १ लाख ७ हजार रुपयांचे संपूर्ण बिल माफ केले.

२३ नोव्हेंबर रोजी रात्री पत्रकार संतोष चौगुले यांच्यामार्फत या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सचिन शिंदे यांनी हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधला. संबंधित कुटुंबाची हलाखीची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी बिल माफ करण्याची विनंती केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत हॉस्पिटल व्यवस्थापनाने संपूर्ण बिल माफ केले.

तसेच बाळाच्या अंत्यसंस्कारासाठी मृतदेह गावी नेण्याकरिता रुग्णवाहिकेची व्यवस्था व्हावी म्हणून सचिन शिंदे यांनी स्वतःच्या खर्चातून ३ हजार रुपयांची मदत केली.

जात, धर्म, भाषा आणि प्रांत यापलीकडे जाऊन माणुसकी जपण्याचा संदेश या मदतीतून देण्यात आला.

ही मदत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अंधेरी पूर्व विधानसभा, प्रभाग क्रमांक ७५ च्या वतीने करण्यात आली. सचिन शिंदे यांनी या सामाजिक कार्यासाठी पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

माणुसकी जपणं हेच खरं समाजकार्य! 🚩

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!