रोटरी क्लब अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोटे. कीर्तीकुमार कोठारी यांची असिस्टंट गव्हर्नरपदी स्तुत्य निवड.

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261123-WA1352

रोटरी क्लब अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोटे. कीर्तीकुमार कोठारी यांची असिस्टंट गव्हर्नरपदी स्तुत्य निवड.

 

अमळनेर : विक्की जाधव.

रोटरी इंटरनॅशनल या सेवाभावी संस्थेद्वारे अमळनेर रोटरी क्लबचे तरुण व सक्रिय सदस्य रोटे. कीर्तीकुमार कोठारी यांची *२०२७-२०२८ साठी असिस्टंट गव्हर्नरपदी निवड करण्यात आली आहे. ते चालू रोटरी वर्ष २०२६-२०२७ साठी अमळनेर एन्क्लेव्ह सेक्रेटरी वरती पदसिद्ध आहेत. रोटरी क्लब अमळनेरद्वारे राबविण्यात आलेले विविध समाज उपयोगी प्रकल्पा अंतर्गत त्यांनी केलेले भरीव सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्याचे दखल घेण्यात आली . त्यांच्या या निवडीबाबत रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे नियुक्त डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सन २०२७-२०२८ रोटे. किशोर राठी, नागपूर यांनी ई-मेलद्वार कळविले आहे.

या निवडीबद्दल रोटरी डिस्ट्रिक्टमधील सर्व ज्येष्ठ मान्यवर सदस्यांनी, रोटरी परिवारातील सदस्यांनी व इतर सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत, अशी माहिती रोटे. मकसूद बोहरी यांनी कळविली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!