अमळनेर तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या सोडवून अपूर्ण घरकुले पूर्ण करा – क्रांतिकारी शेतकरी संघटनेची मागणी

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261123-WA1362

अमळनेर तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या सोडवून अपूर्ण घरकुले पूर्ण करा – क्रांतिकारी शेतकरी संघटनेची मागणी

 

अमळनेर : विक्की जाधव.

तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून, अनेक घरकुले निधीअभावी व प्रशासकीय अडचणींमुळे अपूर्ण अवस्थेत आहेत. या लाभार्थ्यांच्या समस्या सोडवून अपूर्ण घरकुले तातडीने पूर्ण करण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने मा. प्रकल्प संचालक साहेब, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA), जिल्हा परिषद जळगाव यांना आज निवेदन देण्यात आले.

निवेदनात अमळनेर तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना येणाऱ्या विविध अडचणी दूर करणे, रखडलेले हप्ते व अनुदान वेळेत उपलब्ध करून देणे, पात्र लाभार्थ्यांच्या प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करणे तसेच निधी व तांत्रिक कारणांमुळे अपूर्ण राहिलेली घरकुले पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली.गरीब, गरजू व घर नसलेल्या कुटुंबांना शासनाच्या घरकुल योजनांचा लाभ मिळून त्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी भूमिका संघटनेने मांडली.

यावेळी ईश्वर उखा पाटील, योगराज निंबा कोळी, शरद विनायक पाटील, प्रकाश बोरसे, कृष्णा पाटील, रामदास पाटील, दिलीप मधुकर चौधरी व भूषण गोपीचंद कोळी उपस्थित होते. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने घरकुल लाभार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत व त्यांची अपूर्ण घरकुले पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!