स्वामीनारायण संस्कार धाम पानखिडकी येथे अन्नकूट महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा..
अमळनेर : विक्की जाधव.
शहरातील पानखिडकी परिसरातील स्वामीनारायण संस्कार धाम येथे नुकतीच अन्नकूट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची आकर्षक मांडणी करून भगवान श्रीस्वामिनारायण यांना अन्नकूट अर्पण करण्यात आला. भक्तिमय वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
बोरी नदी च्या पत्रात झालेल्या यां अन्नकूट मोहत्सवास अनेकांनी मान्यवरांनी उपस्थती दिली पानखिडकी मंडळाच्या वतीने विविध पदार्थ तयार करून त्यांची सुंदर आरास यावेळी करण्यात आली होती. भाविकांनी श्रद्धा व भक्तिभावाने भगवानांना नैवेद्य अर्पण केला. यावेळी. पूज्य आनंदजीवन स्वामी, पूज्य योगी स्नेहदास स्वामी, पूज्य अखंडमुनीदास स्वामी यांच्या मधुर प्रवचनानें परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.
अन्नकूट महोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, भक्तीभाव आणि अध्यात्मिक संस्कारांची जोपासना करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविकांनी परिश्रम घेतले.