दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जनतेवर घरपट्टी-पाणीपट्टीचा बोजा कशासाठी?

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261123-WA1121

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जनतेवर घरपट्टी-पाणीपट्टीचा बोजा कशासाठी?

 

अमळनेर : विक्की जाधव.

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले असताना ग्रामपंचायतींकडून घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी सुरू असलेली सक्ती तात्काळ थांबवावी, तसेच घरपट्टी व पाणीपट्टी पूर्णपणे माफ करावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने आणि रोजगाराच्या संधी कमी झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत कर वसुलीसाठी तगादा लावणे अन्यायकारक असल्याची भूमिका संघटनेने मांडली.

यासोबतच जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांच्या कामकाजाची तपासणी करून त्यांच्या बायोमेट्रिक हजेरीची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. प्रशासकांची प्रत्यक्ष उपस्थिती, कामकाज आणि ग्रामस्थांच्या प्रश्नांबाबतची कार्यवाही याची प्रशासनाने तपासणी करावी, तसेच संबंधित गटविकास अधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायतींच्या कामकाजाचा व वसुलीचा अहवाल मागवावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना दिलासा देणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, घरपट्टी-पाणीपट्टी माफीचा तातडीने निर्णय घेऊन सर्व ग्रामपंचायतींना याबाबत लेखी आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देतेवेळी ईश्वर उखा पाटील, शरद विनायक पाटील, कृष्णा पाटील, प्रकाश बोरसे, ॲड. योगराज कोळी, दिलीप चौधरी, भूषण कोळी आदी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!